श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्यावर आयसीसीने कारवाई केली आहे. आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं समजतंय. जयसूर्याने आपल्यावरील सर्व आरोप मान्य केल्यानंतर आयसीसीने जयसूर्याला ही शिक्षा सुनावली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रीलंकन क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीचा प्रमुख म्हणून कार्यरत असताना, जयसूर्यावर भ्रष्टाचाराचे आरोप ठेवण्यात आले होते. या आरोपांच्या तपासासाठी आयसीसीचं भ्रष्टाचारविरोधी पथक श्रीलंकेत आलं होतं. मात्र जयसूर्याने या पथकाला चौकशीत सहकार्य न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे चौकशीला असहकार्य केल्याचा ठपका ठेवत जयसूर्यावर कारवाई करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former sri lankan player sanath jayasuriya banned from all cricket for two years after admitting breaching icc anti corruption code
First published on: 26-02-2019 at 18:36 IST