scorecardresearch

फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा : थिम पहिल्याच फेरीत पराभूत ; दिमित्रोव्ह, स्टिफन्सची आगेकूच

पुरुष एकेरीत स्लोव्हेनियाचा अल्जॅझ बेडेने आणि ऑस्ट्रेलियाचा ख्रिस्तोफर ओकोनेल यांच्यात दोन तास, ४८ मिनिटे सामना चालला

पॅरिस : ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिमने रविवारी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीतील पहिल्याच फेरी गाशा गुंडाळला. परंतु बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोव्हने अमेरिकेच्या मार्कोस गिरोनला नमवून दुसरी फेरी गाठली.

बोलिव्हियाच्या ह्युगो डेलिएनने थिमवर ६-३, ६-२, ६-४ असा विजय मिळवला. पण दिमित्रोव्हने गिरोनला एक तास, ३४ मिनिटे चाललेल्या लढतीत ६-१, ६-१, ६-१ असे पराभूत केले. अपेक्षेप्रमाणे सुरुवातीपासूनच आक्रमक फटके मारत त्याने पुनरागमन करण्याची कोणतीच संधी दिली नाही. पुढील फेरीत दिमित्रोव्हचा सामना क्रोएशियाच्या बोर्ना कोरीचशी होईल. कोरीचने पहिल्या फेरीतील सामन्यात स्पेनच्या कार्लोस टॅबर्नरला ३-६, ६-२, ६-३, ६-१ असे पराभूत केले.

पुरुष एकेरीत स्लोव्हेनियाचा अल्जॅझ बेडेने आणि ऑस्ट्रेलियाचा ख्रिस्तोफर ओकोनेल यांच्यात दोन तास, ४८ मिनिटे सामना चालला. या रोमहर्षक सामन्यात बेडेनेने ख्रिस्तोफरचा ६-२, ६-४, ६-७, ६-१ असा पराभव केला. महिला एकेरीत जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या टय़ुनिशियाच्या ओन्स जाबेरला पहिल्याच फेरीत ५२व्या क्रमांकावरील पोलंडच्या मॅग्डा लीनेत्तेने ६-३, ६-७, ५-७ असे हरवले. अन्य लढतीत, अमेरिकेच्या स्लोन स्टीफन्सने जर्मनीच्या ज्युली निएमेइयरचा ५-७, ६-४, ६-२ असा पराभव केला, तर रोमानियाच्या सोराना सिरस्तेआने जर्मनीच्या तत्जाना मारियाला ६-३, ६-३ असा सरळ सेटमध्ये नमवले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: French open 2022 thiem suffers first round exit zws