एपी, पॅरिस

जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांपैकी एक असलेल्या डॅनिल मेदवेदेवला ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स डी मिनाऊरकडून फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पराभवाचा सामना करावा लागला. पुरुष एकेरीच्या अन्य सामन्यात इटलीचा यानिक सिन्नेर व बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोव यांनी आपापल्या सामन्यात विजय नोंदवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. महिला गटात अरिना सबालेन्का व कझाकस्तानची एलिना रायबाकिना यांनी विजय नोंदवत पुढच्या फेरीत धडक मारली.

Ashwin reveals how angry MS Dhoni on S Sreesanth
MS Dhoni : ‘त्याला उद्याच भारतात परत पाठवा…’, दक्षिण आफ्रिकेत धोनी श्रीसंतवर का संतापला होता? अश्विनने केला खुलासा
Copa America football tournament Brazil challenge ends
कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा: ब्राझीलचे आव्हान संपुष्टात
Portugal knocked out by France in Euro Championship football sport news
फ्रान्सकडून पोर्तुगाल शूटआऊट; अखेरच्या युरो सामन्यात ख्रिास्तियानो रोनाल्डो अपयशी
Portugal beat Slovenia on penalties sport news
पेनल्टीच्या नाट्यात पोर्तुगालचा विजय; स्लोव्हेनियावर ३-० ने मात करत उपांत्यपूर्व फेरीत
England beat Slovakia to reach the quarter-finals of the Euro Football Championship sport news
अलौकिक बेलिंगहॅमने इंग्लंडला तारले! स्लोव्हाकियाला नमवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
South Africa vs Afghanistan, T20 World Cup semi-final
T20 World Cup 2024 : दक्षिण आफ्रिकेला अफगाणिस्तान रोखणार?उपांत्य फेरीच्या लढतीत आज आमनेसामने
Euro Championship football tournament Scotland vs Switzerland football match
शकिरीच्या शानदार गोलमुळे स्वित्झर्लंडची स्कॉटलंडशी बरोबरी
Portugal beat Czech Republic football news
कॉन्सेसाओने पोर्तुगालला तारले! सलामीच्या लढतीत चेक प्रजासत्ताकवर संघर्षपूर्ण विजय

मिनाऊरविरुद्धच्या सामन्यात पाचव्या मानांकित मेदवेदेव विजय मिळवेल असे दिसत होते. पहिला सेटही त्याने जिंकत चांगली सुरुवात केली. मात्र, मिनाऊरने यानंतर मेदवेदेवला सामन्यात पुनरागमन करण्याची कोणतीच संधी न देता ४-६, ६-२, ६-१, ६-३ असे पराभूत करत धक्कादायक निकालाची नोंद केली. पुरुष एकेरीच्या अन्य सामन्यांमध्ये दुसऱ्या मानांकित सिन्नेरने फ्रान्सच्या कॉरेन्टिन मौटेटला २-६, ६-३, ६-२, ६-१ असे नमवले. तर, दिमित्रोवने पोलंडच्या हबर्ट हुरकाझला ७-६ (७-५), ६-४, ७-६ (७-३) अशा फरकाने पराभूत केले.

हेही वाचा >>> Sri Lanka vs South Africa : दक्षिण आफ्रिकेची श्रीलंकेवर सरशी; नॉर्किए, रबाडाचा प्रभावी मारा

महिला एकेरीत दुसऱ्या मानांकित सबालेन्काने अमेरिकेच्या एमा नवारोवर ६-२, ६-३ असा सरळ सेटमध्ये विजय नोंदवला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच सबालेन्काने नवारोला पुनरागमनाची कोणतीच संधी दिली नाही. तर, चौथ्या मानांकित रायबाकिनाने युक्रेनच्या एलिना स्वितोलिनाला ६-४, ६-३ अशा फरकाने पराभूत केले. १२व्या मानांकित इटलीच्या जॅस्मिन पाओलिनीने एलिना अवानेस्यानचा ४-६, ६-०, ६-१ असा पराभव केला.

बोपण्णाएब्डेन जोडीची आगेकूच

भारताचा रोहन बोपण्णा व त्याचा ऑस्ट्रेलियाचा साथीदार मॅथ्यू एब्डेन जोडीने पुरुष दुहेरीच्या तिसऱ्या फेरीतील सामन्यात भारताचा एन.श्रीराम बालाजी आणि मेक्सिकोच्या मिगुएल रेयास-वरेला जोडीवर ६-७ (२-७), ६-३, ७-६ (१०-८) असा विजय मिळवला. सामन्यातील पहिला सेट गमावल्यानंतर बोपण्णा-एब्डेन जोडीने पुनरागमन करताना विजयाची नोंद केली.