scorecardresearch

Premium

राहुल द्रविडची पुन्हा प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर गंभीरचे सूचक विधान; म्हणाला, “विश्वचषक पराभवाचा…”

Gautam Gambhir on Rahul Dravid: राहुल द्रविडला पुन्हा मुख्य प्रशिक्षक बनवल्यानंतर चाहते दोन गटात विभागले गेले. गौतम गंभीरनेही यावर सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

Don't talk about winning the World Cup after Rahul Dravid became coach Gautam Gambhir big statement
राहुल द्रविडला पुन्हा मुख्य प्रशिक्षक बनवल्यानंतर गौतम गंभीरने यावर सूचक प्रतिक्रिया दिली आहे. सौजन्य- (ट्वीटर)

Rahul Dravid Head Coach Reactions: राहुल द्रविड भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहील. सर्व चर्चांना पूर्णविराम देत बीसीसीआयने बुधवारी या पदावर कायम राहण्याची घोषणा केली. याशिवाय उर्वरित कोचिंग स्टाफचा कार्यकाळही वाढवण्यात आला आहे. म्हणजेच विक्रम राठोड हे फलंदाजी प्रशिक्षक, पारस म्हांबरे गोलंदाजी प्रशिक्षक आणि टी दिलीप क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदी कायम राहणार आहेत. यावर गौतम गंभीरची प्रतिक्रिया समोर आली आहे. द्रविड आणि बीसीसीआयच्या या निर्णयावर त्याने आनंद व्यक्त केला आहे.

सोशल मीडिया दोन गटात विभागला गेला

राहुल द्रविड प्रशिक्षक झाल्यानंतर चाहते सोशल मीडियावर लिहित आहे की, “वर्ल्ड कप जिंकण्याबद्दल बोलू नका.” दुसऱ्या यूजरने लिहिले की, “द्रविड साहेब विश्वचषक जिंकल्यानंतरच जातील.” एका यूजरने त्याच्या समर्थनात लिहिले की, “द्रविडने काहीही वाईट केले नाही.” अशा अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. चाहते सोशल मीडियावर दोन गटात विभागले गेले आहेत आणि काहीजण राहुल द्रविड पुन्हा प्रशिक्षक झाल्यामुळे खूश आहेत तर काहींना बीसीसीआयचा हा निर्णय आवडला नाही.

Nitish Kumar New cm of bihar
नवव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नितीश कुमारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी जिथं होतो…”
Mallikarjun Kharge writes to Mamata Banerjee requesting security for Bharat Jodo Nyaya Yatra
‘भारत जोडो न्याय यात्रे’ला सुरक्षा पुरवावी! मल्लिकार्जुन खरगे यांची ममता बॅनर्जीना पत्र लिहून विनंती
Ankita lokhande mother reacted on Vicky jain party with girls
लेक घरी नसताना जावयाने गर्ल गँगसह केली पार्टी; अंकिता लोखंडेच्या आई म्हणाल्या, “विकीने त्या सर्वांना…”
ajit pawar marathi news, ajit pawar rohit pawar, rohit pawar ed notice marathi news,
“आम्ही त्याचा इव्हेंट करत नाही, माझी ५ तास चौकशी झाली…”, रोहित पवारांच्या ईडी नोटीशीवर अजित पवार म्हणाले…

द्रविडबद्दल काय म्हणाला गंभीर?

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडच्या कराराच्या विस्तारावर, माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर म्हणाला, “ही चांगली गोष्ट आहे कारण, टी-२० विश्वचषक जवळ आला आहे आणि तुम्हाला संपूर्ण सपोर्ट स्टाफ बदलायचा नाहीये. मात्र, विश्वचषक २०२३ पराभवाचा विषय आता काढून त्यावर चर्चा करू नका. राहुल द्रविडने या पदावर कायम राहण्याचे मान्य केले हा चांगला निर्णय त्याने घेतला आहे. आशा आहे की आपण जागतिक क्रिकेटवर वर्चस्व कायम राखू आणि आणखी चांगले क्रिकेट खेळू.”

बीसीसीआयने द्रविडला या पदावर कायम ठेवण्याची घोषणा केली

नुकत्याच संपलेल्या विश्वचषकानंतर द्रविडच्या प्रशिकपदाचा करारही संपला होता. बीसीसीआयने राहुल द्रविडशी चर्चा केली आणि कार्यकाळ वाढवण्यास सर्वानुमते सहमती दर्शवली. “भारतीय संघाच्या उभारणीत द्रविडच्या महत्त्वाच्या भूमिकेची बोर्डाने कबुली दिली आणि त्याच्या लक्षणीय कामगिरीची देखील प्रशंसा केली. एनसीए प्रमुख आणि अस्थायी मुख्य प्रशिक्षक म्हणून व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या अप्रतिम भूमिकांसाठी बोर्ड त्यांचे कौतुक करते. त्यांच्या प्रसिद्ध मैदानावरील भागीदारीप्रमाणेच, द्रविड आणि लक्ष्मण यांनी भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यासाठी एकत्र काम केले आहे,” असे बीसीसीआयने त्यांच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले.

केकेआरमध्ये परतल्यावर गंभीर काय म्हणाला?

दुसरीकडे, गंभीरची अलीकडेच कोलकाता नाईट रायडर्सने (केकेआर) मेंटॉर म्हणजेच मार्गदर्शक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यावर उत्तर देताना तो म्हणाला, “मी त्या ठिकाणी परत जात आहे जिथे खूप भावना, घाम, मेहनत केली होती. त्या सर्व आठवणी परत डोळ्यासमोर आल्या. ही एक नवीन सुरुवात आहे आणि आशा आहे की आम्ही चांगली कामगिरी करू शकू. केकेआर माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे कारण, बंगालच्या लोकांकडून मला मिळालेल्या प्रेमाची परतफेड करण्याची वेळ आली आहे.” गंभीर यापूर्वी मागील दोन हंगामात (२०२२ आणि २०२३) लखनऊ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक होता.

हेही वाचा: IND vs SL: भारत करणार श्रीलंकेचा दौरा, वन डे आणि टी-२० मालिकेत होणार सहभागी; जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम

लखनऊला त्याच्या कार्यकाळात दोन्ही मोसमात अंतिम चारमध्ये पोहोचण्यात यश आले, पण ते कधीही अंतिम फेरीत पोहोचू शकले नाहीत. मात्र, या हंगामात त्याने लखनऊ सोडले आणि अनेक वर्षे कर्णधार असलेल्या संघाचा मार्गदर्शक बनला आणि त्याच्या नेतृत्वाखाली संघाला चॅम्पियन बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. कोलकाताबरोबर त्याने कर्णधार म्हणून दोन विजेतेपदे (२०१२, २०१४) जिंकली आहेत. गंभीर आता केकेआरमध्ये मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांच्या समवेत मार्गदर्शक म्हणून काम करेन.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gambhirs reaction on dravid continuing as head coach came to the fore said this on returning to kkr avw

First published on: 29-11-2023 at 18:28 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×