भारतीय संघाचा डावखुरा फलंदाज गौतम गंभीर याला तशी लोकप्रियतेची जास्त आवड नाही, पण मैदानातील प्रसंगामुळे तो नेहमी चर्चेत असतो. मैदानाबाहेर त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्यात सामाजिक भान राखत सर्वांची वाहवा मिळवली आहे. १९९८ सालच्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केलेल्या माजी बॉक्सर डिंगको सिंगच्या मदतीसाठी गंभीरने मदतीचा हात पुढे केला. मिळालेल्या माहितीनुसार, डिंगको एका गंभीर आजाराचा सामना करत असून त्याचे यकृत ७० टक्के निकामी झाले आहे. आर्थिक चणचण असलेल्या डिंगको सिंगला सध्या केमोथेरपीसाठीचा खर्च परवड नाही. डिंगकोबद्दलची बातमी कळताच गंभीरने क्षणाचाही विलंब न करत त्याच्याशी संपर्क साधून मदतीचा हात पुढे केला. गंभीरने घेतलेला पुढाकार नक्कीच कौतुकास्पद आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

डिंगकोने आजवर उपचारासाठी लाखो रुपये खर्च केले. पुढील उपचारासाठी खिसा रिकामा झाल्याने त्याने आपली मालमत्ता विकण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली होती. याबद्दलची माहिती मिळताच गंभीरने डिंगकोला मदतीसाठीचा हात पुढे केला. बॉक्सर विजेंद्र सिंग याला याबद्दलची माहिती मिळाल्यानंतर त्याला धक्काच बसला. तो म्हणला की, मी कालच रात्री भारतात आलो आणि डिंगकोबद्दलची माहिती मिळाली. धक्काच बसला. डिंगको माझा हिरो असून त्याच्याकडे पाहूनच मी बॉक्सिंग शिकलो. केंद्रीय क्रिडामंत्री विजय गोयल यांनीही याची माहिती मिळताच डिंगको हवी ती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

 

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gautam gambhir came in support of former indian boxer dingko singh
First published on: 09-02-2017 at 14:02 IST