Goa announced as official host for the FIDE World Cup 2025 : गेल्या काही वर्षांमध्ये बुद्धिबळ या खेळाची लोकप्रियता जगभरात झपाट्याने वाढल्याचे पाहायला मिळत आहे. भारतात देखील दिवसेंदिवस या खेळाचे चाहते चांगलेच वाढत आहेत. यादरम्यान भारतीय बु्द्धिबळप्रेमींसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. यंदाचा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आयोजित होणारा ‘फिडे वर्ल्ड कप २०२५’ हा गोव्यात होणार आहे. या स्पर्धेत २०६ खेळाडू सहभागी होणार आहेत. तसेच महत्त्वाची बाब म्हणजे या स्पर्धेतून २०२६ च्या कॅन्डिडेट्स टूर्नामेंटसाठी तीन जणांना आपले स्थान निश्चित करता येणार आहे. त्यामुळे भारतीय बुद्धिबळ खेळाडूंसाठी ही चांगली संधी असणार आहे.

या स्पर्धेत सहभागी झालेले खेळाडू हे २,०००,००० अमेरिकन डॉलर्स इतक्या प्रचंड मोठ्या रकेमेसाठी स्पर्धेत उतरती. तसेच या स्पर्धेची प्रत्येक फेरी ही नॉक-आउट असणार आहे, त्यामुळे यामध्ये वेगळाच थरार अनुभवता येणार आहे.

ही आठ फेऱ्यांची नॉक-आउट पद्धतीची स्पर्धा असणार आहे, म्हणजे स्पर्धेत प्रत्येक पराभूत खेळाडू स्पर्धेतून बाहेर पडेल. दुसऱ्या फेरीत ५० खेळाडू पुढे जातील. स्पर्धेतील प्रत्येक सामना हा दोन क्लासिकल गेम्सचा असेल, जो बरोबरीत सुटल्यास रॅपिड आणि ब्लिट्झ गेम्स खेळले जातील.

भारत हा बिद्धिबळाच्या क्षेत्रात एक मोठी ताकद म्हणून पुढे येत आहे. गेल्या वर्षी गुकेशन जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकली आहे. इतकेच नाही तर भारतीय संघांनी ओपन आणि महिला अशा दोन्ही प्रकारात चेस ऑलिंपियाड स्पर्धा देखील जिंकली आहे.

यानंतर महाराष्ट्रातील नागपूरच्या दिव्या देशमुखने नुकतेच यावर्षीचा महिला विश्वचषक जिंकला आहे. यामुळे भारतीय खेळाडू गोव्यात होत असलेल्या या स्पर्धेत कशी कामगिरी करतील याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

“भारत हा सर्वात शक्तीशाली बुद्धिबळ राष्ट्रांपैकी एक झाले आहे, जेथे उत्कृष्ट खेळाडू आणि उत्कट चाहते आहेत. या वर्षीच्या सुरूवातीला जॉर्जियामध्ये पार पडलेल्या महिला फिडे वर्ल्ड कपच्या यशानंतर आता फिडे वर्ल्ड कप गोव्यात घेऊन येताना आम्हाला अभिमान वाटतो आहे,” असे मत फिडेचे अध्यक्ष Arkady Dvorkovich यांनी त्यांच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे. ३० ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत गोवा येथे ही स्पर्धा होणार आहे. या