प्रो कबड्डी लीगमध्ये गुजरात फॉच्र्युनजायंट्सला सलग तिसरा पराभव पत्करावा लागला. शनिवारी तमिळ थलायव्हाजने गुजरातला ३४-२८ असे नामोहरम केले. तमिळ संघाकडून अजय ठाकूर (९ गुण) आणि मोहित चिल्लर (५ गुण) यांनी दिमाखदार खेळ केला. गुजरातचा पराभव टाळण्यासाठी रोहित गुलियाने (९ गुण) झुंजार खेळ केला. परंतु सलग दोन वेळच्या उपविजेत्यांना पराभवाचेच तोंड पहावे लागले.

दुसऱ्या सामन्यात दबंग दिल्लीने पुणेरी पलटणला ३२-३० असे पराभूत केले. दिल्लीच्या विजयात नवीन कुमार (११ गुण) आणि चंद्रन रंजित (८ गुण) यांनी महत्त्वाचे योगदान दिले. पुण्याकडून नितीन तोमर छान खेळला.