भारतीय संघाने ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक कसोटी मालिका विजय मिळवला. १-१ अशा बरोबरीत असलेल्या कसोटी मालिकेत चौथा सामना भारताने जिंकला आणि यजमानांचा अबाधित गड सर केला. त्या सामन्यात अनेक खेळाडूंनी महत्त्वाची भूमिका बजावली. पण संपूर्ण मालिकेत भारतासाठी अभेद्य भिंत बनून उभा राहिला तो चेतेश्वर पुजारा. त्याने चौथ्या डावात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा मारा शरीरावर झेलत २००हून अधिक चेंडू खेळले. त्याच्या चिवट खेळीपुढे ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा माराही फिका पडला. शरीराच्या विविध अवयवांवर चेंडूचा मारा सहन करत त्याने धडाकेबाज खेळी केली. त्याचं हे रूप पाहून BCCIने त्याला खास पदवी बहाल केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चेतेश्वर पुजाराचा आज वाढदिवस. आज पुजाराने ३४व्या वर्षात पदार्पण केले. यानिमित्त BCCIने पुजाराला एक पदवी बहाल करत त्याचा सन्मान केला. “हा खेळाडू शरीरावर वेगवान चेंडूंचा मारा सहन करतो, तरीदेखील खेळपट्टीवर खंबीरपणे तळ ठोकून उभा राहतो. हा खरा धाडसी खेळाडू आहे. ८१ कसोटी सामने, ६ हजार १११ धावा, १३ हजार ५७२ चेंडू आणि १८ शतकं ठोकणाऱ्या भारतीय संघाचा ‘आधारस्तंभ’ (Mr. Dependable) चेतेश्वर पुजारा याला वाढदिवसाच्या शुभेच्छा!”, असं ट्विट BCCIने केलं.

इतर सहकाऱ्यांनीही दिल्या शुभेच्छा-

चौथ्या कसोटीच्या चौथ्या डावात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी चेतेश्वर पुजारावर अनेक प्रहार करण्याचे प्रयत्न केले. पण कांगारुंच्या शरीरभेदी माऱ्याला पुजारा पुरून उरला. मिचेल स्टार्क, जोश हेजलवूड, पॅट कमिन्स आणि कॅमरॉन ग्रीन या ऑस्ट्रेलियाच्या चार वेगवान गोलंदाजांनी सातत्याने पुजाराच्या शरीराच्या जवळपास मारा केला. चेंडूला मिळणारी उसळी पाहता अनेक चेंडू पुजाराने अंगावर खाल्ले. स्वत:ची विकेट वाचवताना कधी खांद्याजवळ, कधी हाताच्या बोटावर तर कधी हेल्मेटवर चेंडू आदळला. पण एखाद्या भिंतीप्रमाणे अभेद्य असा तो यजमान संघापुढे उभा राहिला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Happy birthday cheteshwar pujara bcci virat kohli cricket fraternity pour wishes see comedy tweets vjb
First published on: 25-01-2021 at 13:45 IST