भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग गुरुवारी प्रेयसी गीता बसराशी विवाहबद्ध झाला. हरभजन आणि गीता यांचे प्रेमप्रकरण गेल्या पाच वर्षांपासून सुरू होते, अखेर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
लग्नाच्या वेळी हरभजनने दुधी रंगाची शेरवानी परिधान केली होती. त्याचबरोबर लाल रंगाची पगडी घातली होती. गीताने या वेळी लाल आणि सोनेरी रंगाचा पारंपरिक लेहेंगा परिधान केला होता. या वेळी लग्नाच्या सोहळ्याला भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर पत्नी अंजलीसह उपस्थित होता.
हरभजन आणि गीता यांनी बऱ्याच पंजाबी चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. चित्रीकरणादरम्यान या दोघांचे सूत जमले आणि पाच वर्षांनंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.