भारतीय क्रिकेट संघाचा ऑफस्पिनर हरभजन सिंगने पुण्यात मोबाइल करोना चाचणी प्रयोगशाळा सुरू केली आहे. ही प्रयोगशाळा आजपासून सुरू झाली. आयपीएल २०२१मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणार्‍या हरभजनने ट्विटरवरून याबाबत माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भज्जी म्हणाला, “आम्ही या कठीण काळात इतरांना मदत करून फक्त एक छोटेसे कार्य करत आहोत. मला आशा आहे, कि वाहेगुरू सर्वांना सुरक्षित ठेवतील. आपण करोनाविरुद्धची ही लढाई नक्कीच जिंकू.”

 

एका अहवालानुसार, ही प्रयोगशाळा प्रत्येक ठिकाणी जाऊन एका दिवसात १५०० नमुने गोळा करेल. यात आरटी-पीसीआर चाचणीचा निकाल काही तासांत दिला जाईल. या मदतीमुळे करोना चाचणी वेगवान होईल आणि या आपत्कालीन परिस्थितीत महत्त्वपूर्ण योगदान देता येईल. यामध्ये लोकांना विनामुल्य चाचणी करता येईल, तर काही लोकांना ५०० रूपये खर्च येऊ शकतो.

हरभजनची क्रिकेट कारकीर्द

हरभजन सिंग २०१६पासून भारतीय संघातून बाहेर आहे. भज्जीने टीम इंडियाकडून १०३ कसोटी सामन्यांमध्ये ४७१, २३६ एकदिवसीय सामन्यांमध्ये २६९ आणि २८ टी-२०मध्ये २५ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने २०१५ मध्ये श्रीलंकेविरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला, तर त्याचवर्षी त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. हरभजनन २००७ आणि २०११ च्या वर्ल्डकप विजेत्या टीम इंडियाचा सदस्य राहिला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harbhajan singh is setting up a mobile covid 19 testing laboratory in pune adn
First published on: 24-04-2021 at 18:31 IST