चेंबूर जिमखाना आयोजित राज्य वरिष्ठ बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत हर्षिल दाणीने पुरुष गटात तर मुद्रा धैनजेने जेतेपदावर नाव कोरले. अव्वल मानांकित हर्षिलने सिद्धार्थ ठाकूरवर २१-१२, २१-१६ असा विजय मिळवला. तृतीय मानांकित मुद्राने चौथ्या मानांकित नेहा पंडितवर २१-१६, २१-१६ अशी मात केली. महिला दुहेरीत मानसी गाडगीळ आणि वैष्णवी अय्यर जोडीने ऐश्वर्या नारायणमूर्ती आणि वल्लरी बुकाणे जोडीला २१-१६, २१-१५ असे नमवले. मिश्र दुहेरीत निषाद द्रविड आणि मानसी गाडगीळ जोडीने गोविंद सहस्रबुद्धे आणि वैष्णवी भाले जोडीचा २१-१३, २१-१६ असा पराभव केला.