हरयाणाचा २५ वर्षीय प्रथम श्रेणी क्रिकेटपटू संदीप सिंगचे एका अपघातात निधन झाले. मुंडाळ गावी ट्रॅक्टरने धडक दिल्यामुळे संदीपचा मृत्यू झाला. यष्टीरक्षक संदीपने १५ प्रथम श्रेणी, ११ ‘अ’ गटाच्या व १६ ट्वेन्टी-२० लढतीत हरयाणाचे प्रतिनिधित्व केले होते. २०१२मध्ये बडोद्याविरुद्ध त्याने शेवटचा प्रथम श्रेणी सामना खेळला होता. स्थानिक फुटबॉल स्पर्धेसाठी मैदान तयार करण्यासाठी तो युवा खेळाडूंना मदत करत होता. हे काम सुरू असताना ट्रॅक्टरचा ताबा सुटला व हा अपघात झाला, असे हरयाणा क्रिकेट संघटनेचे प्रमुख अनिरुद्ध चौधरी यांनी सांगितले.