३ ते १२ मार्चदरम्यान भारतीय महिला संघाच्या कोरिया दौऱ्यासाठी आज हॉकी इंडियाने २० सदस्यीय महिला संघाची घोषणा केली आहे. या दौऱ्यासाठी भारताची अनुभवी खेळाडू राणी रामपालकडे पुन्हा एकदा संघाचं नेतृत्व देण्यात आलेलं आहे. याचसोबत आघाडीच्या फळीतली खेळाडू पुनम राणीनेही संघात पुनरागमन केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बचावपटू सुनीता लाक्रा ही या दौऱ्यात भारतीय संघाची उप-कर्णधार म्हणून काम पाहणार आहे. गोलकिपर सविताला मात्र या दौऱ्यात विश्रांती देऊन नवीन खेळाडूंना संधी देण्यात आलेली आहे.

कोरिया दौऱ्यासाठी असा असेल भारतीय महिलांचा संघ –

गोलकिपर – रजनी इतिमारपु, स्वाती

बचावपटू – दिपीका, सुनीता लाक्रा (उप-कर्णधार), दिप ग्रेस एक्का, सुमन देवी, गुरजीत कौर, सुशीला चानु

मधली फळी – मोनिका, नमिता टोपु, निक्की प्रधान, नेहा गोयल, लिलीमा मिन्झ, उदीता

आघाडीची फळी – राणी रामपाल (कर्णधार), वंदना कटारिया, लारेमिसामी, नवज्योत कौर, नवनीत कौर, पुनम राणी

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hockey india announced 20 member squad of womens team for upcoming korea tour
First published on: 23-02-2018 at 13:13 IST