मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवसानिमीत्त साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय खेळ दिवसाच्या निमीत्ताने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशातील निवडक खेळाडूंचा सत्कार केला आहे. हॉकीपटू सरदार सिंह आणि पॅरालिम्पिकपटू देवेंद्र झाजरियाचा मानाच्या खेलरत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला. राष्ट्रपती भवनात आज हा सोहळा पार पडला. याव्यतिरीक्त १७ क्रिडापटूंना अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अवश्य वाचा – Major Dhyanchand Birth Anniversary Special : …तोपर्यंत हॉकीला पुन्हा अच्छे दिन येणार नाहीत!

क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा, महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, पॅरालिम्पीकपटू मरिअप्पन थंगवेलू, वरुण भाटी, एसएसपी. चौरसिया, साकेथ मायनेई, खुशबीर कौर, आरोक्य राजीव, प्रशांती सिंह, एसव्ही सुनील, सत्यव्रत कादियान, अँथोनी अमालराज, पीएन प्रकाश, ज्योती सुरेखा वेन्नम, जसवीर सिंह, देवेंद्रो सिंह, बेंमबेम देवी या क्रिडापटूंना अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आलं. सध्या काऊंटी क्रिकेटमध्ये खेळत असल्यामुळे चेतेश्वर पुजारा या सोहळ्याला हजर राहू शकला नाही.

याव्यतिरीक्त विविध क्रिडाप्रकारांमध्ये प्रशिक्षणाची भूमिका बजावणाऱ्या प्रशिक्षकांचा द्रोणाचार्य पुरस्काराने गौरव करण्यात आला. याव्यतिरीक्त निता अंबानी यांना राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्काराने गौरवण्यात आलं.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hockey star sardar singh para olympic star devendra jhajariya received khelratna award from president ramnath kovind
First published on: 29-08-2017 at 18:22 IST