मुंबई उच्च न्यायालयाने आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीची चौकशी करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) नेमलेली चौकशी समिती बेकायदा आणि घटनाबाह्य असल्याच्या दिलेल्या निकालावर बीसीसीआयचे अकार्यरत अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
बीसीसीआयच्या द्विसदस्यीस चौकशी समितीने जाहीर केलेल्या अहवालात श्रीनिवासन यांना क्लीन चीट देण्यात आली होती. त्यामुळे बीसीसीआयच्या अध्यक्षपदी श्रीनिवासन पुन्हा विराजमान होण्याची चिन्हे होती. परंतु, न्यायालयाच्या या निर्णयामुळे बीसीसीआयला चांगलीच चपराक बसली आहे. त्यामुळे श्रीनिवासन यांच्या परतीचा मार्ग खडतर होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर न्यायालयाने संपूर्ण प्रकरणाची बीसीसीआयला नव्याने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I dont want to say anything srinivasan
First published on: 31-07-2013 at 04:58 IST