क्रिकेट विश्वचषक स्पर्धा येत्या ३० मे पासून सुरु होत आहे. सर्व संघांनी विश्चचषक स्पर्धा जिंकण्यासाठी कसून तयारी सुरु केली आहे. या स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक खेळाडू आपल्या संघाला जिंकवण्यासाठी कारकिर्दीतला सर्वोच्च खेळ सादर करण्यासाठी सज्ज आहे. या आधीही ‘सनथ जयसूर्या’, ‘ग्लेन मेग्रा’, ‘युवराज सिंह’ यांसारख्या अनेक खेळाडूंनी अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करून आपल्या संघाला विश्वचषक जिंकवून देण्याचा करिश्मा केला आहे. परंतु दरम्यान असेही काही खेळाडू होऊन गेले ज्यांनी स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी केली तरीही त्यांच्या हाती निराशाच आली. त्यांना आपल्या संघाला विश्वचषक जिंकवून देता आले नाही. चला जाणून घेऊया अशा काही खेळाडूंबद्दल ज्यांनी प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा मान पटकवला मात्र ते आपल्या संघाला विश्वचषक जिंकवून देण्यात अपयशी ठरले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मार्टिन क्रो- १९९२

न्यूझीलंड संघाचा माजी कर्णधार मार्टिन क्रो याने १९९२च्या विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याने ९ सामन्यांमध्ये ११४ च्या सरासरीने ४५६ धावा केल्या होत्या. दरम्यान त्याने ४ अर्धशतक व १ शतकही झळकावले होते. या सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी मार्टिन क्रो याला प्लेअर ऑफ द टूर्नामेंट हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात स्पर्धेत प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा मान मिळवणारा मार्टिन क्रो हा पहिला खेळाडू होता. संपूर्ण स्पर्धेत न्यूझीलंड संघाने उत्कृष्ट कामगिरी बजावली होती. परंतु उपांत्य फेरित पाकिस्तानने न्यूझीलंड संघाला हरवले. अखेर स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी करूनही मार्टिन क्रो न्यूझीलंड संघाला विश्वचषक जिंकवून देण्यास अपयशी ठरला.

लान्स क्लूजनर – १९९९

१९९९ च्या विश्वचषक स्पर्धेत लान्स क्लूजनरने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन केले. विश्वचषक स्पर्धेत त्याने दक्षिण आफ्रिका संघातून खेळताना ९ सामन्यांमध्ये १७ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. दरम्यान त्याने २८१धावा देखील केल्या होत्या. या स्पर्धेत भारताच्या राहूल द्रवीड सर्वाधिक ४६१ धावा केल्या तर न्यूझीलंडच्या ज्योफ अलॉट याने सर्वाधिक २० विकेट्स घेतल्या होत्या. परंतु लान्स क्लूजनरने गोलंदाजी व फलंदाजी या दोन्ही प्रकारात उत्तम खेळाचे प्रदर्शन केल्यामुळे त्याला प्लेअर ऑफ द टूर्नामेंट या पुरस्काराने गौरवण्यात आले. मात्र तरीही त्याला दक्षिण आफ्रिका संघाला विश्वचषक जिंकवून देण्याचे स्वप्न साकार करता आले नाही.

सचिन तेंडुलकर – २००३

मार्टिन क्रो आणि लान्स क्लूजनर यांच्यानंतर असाच काहीसा प्रसंग भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन सचिन तेंडुलकरच्या बाबतीत घडला. २००३च्या विश्वचषक स्पर्धेत सचिनने तुफान फटकेबाजी केली. मात्र तरही तो भारताला विश्वचषक जिंकवून देण्यास अपयशी ठरला. या स्पर्धेत सचिनने ११ सामन्यांमध्ये ६७३ धावा केल्या होत्या. यांत ६ अर्धशतके व १ शतक होते. विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला हरवले होते.

सध्या विश्वचषक स्पर्धेची जोरदार तयारी सुरू आहे. भारतीय संघ विश्वचषक २०१९चा सर्वात प्रबळ दावेदार मानला जात आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icc cricket world cup 2019 sachin tendulkar martin crowe lance klusener
First published on: 24-05-2019 at 19:02 IST