T20 World Cup: इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गन संघातून बाहेर पडण्यास तयार; म्हणाला, मी संघ आणि…

३५ वर्षीय डावखुऱ्या फलंदाजाने या वर्षी इंग्लंडसाठी सात टी -२० सामन्यांमध्ये फक्त ८२ धावा केल्या आहेत.

Icc mens t20 world cup eoin morgan ready to drop himself t20 world
(सौजन्य: Reuters)

खराब फॉर्ममधून जात असलेल्या इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गनने आपल्या संघाला टी -२० विश्वचषक जिंकण्याच्या मार्गात येणार नाही असे म्हटले आहे. जर त्याचा खराब फॉर्म सुरू राहिला, तर तो स्वतःला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर काढू शकतो. इंग्लंडला एकमेव विश्वचषक जिंकणाऱ्या मॉर्गनने सोमवारी भारताविरुद्धच्या सराव सामन्यात भाग घेतला नाही. या सामन्यात इंग्लंडचा सहा गडी राखून पराभव झाला. पण मॉर्गन बुधवारी न्यूझीलंडविरुद्धच्या सराव सामन्यात मैदानात उतरणार आहे.

इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गनने मंगळवारी सांगितले की, जर तो खराब फॉर्ममधून परतू शकला नाही तर तो टी २० विश्वचषक स्पर्धेतून संघातून बाहेर पडण्यास तयार आहे. ३५ वर्षीय डावखुऱ्या फलंदाजाने या वर्षी इंग्लंडसाठी सात टी -२० सामन्यांमध्ये फक्त ८२ धावा केल्या आहेत.

‘विश्वचषक जिंकणाऱ्या संघाच्या मार्गात मी येणार नाही. माझ्या बॅटिंगमधून धावा मिळत नाहीत पण मी माझी कर्णधारपदाची जबाबदारी खूप चांगली पार पाडली आहे, असे मॉर्गनने बीबीसीला सांगितले. तो स्वतःला संघाबाहेर ठेवण्यास तयार आहे का असे विचारले असता मॉर्गन म्हणाला, “हा नेहमीच पर्याय असतो.”

मॉर्गन पुढे म्हणाला, ‘मी माझ्या सर्वात वाईट फॉर्ममधून बाहेर पडलो नसतो तर मी इथे उभा राहिलो नसतो. मी जिथे जिथे टी -२० क्रिकेट खेळायला येतो, तिथे मला खूप जोखीम घ्यावी लागते.” इंग्लंड विश्वचषकाची सुरुवात शनिवारी दुबईत वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्याने करणार आहे.

वर्ल्ड कप २०१९ पासून मॉर्गन खराब फॉर्ममधून जात आहे. यावर्षी त्याचा त्रास खूप वाढला आहे. मॉर्गनने या वर्षी सात टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ८२ धावा केल्या आहेत. आयपीएल २०२१ मध्ये केकेआरचे कर्णधारपद स्वीकारलेल्या मॉर्गनने आयपीएल १४ मध्ये ११.०८ च्या सरासरीने १३३ धावा केल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Icc mens t20 world cup eoin morgan ready to drop himself t20 world abn

Next Story
हॉकीबाबतचा फैसला ३ नोव्हेंबरला
ताज्या बातम्या