दुबई : श्रीलंकेचा ऑफ-स्पिनर अकिला धनंजयावर गोलंदाजीच्या अवैध शैलीप्रकरणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) निलंबनाची कारवाई केली आहे.गेल्या महिन्यात इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात धनंजयावर संशयास्पद गोलंदाजीच्या शैलीचा ठपका ठेवण्यात आला. इंग्लंडने या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत ३-० असे निभ्रेळ यश मिळवले होते.ब्रिस्बेन येथे धनंजयाच्या गोलंदाजीच्या शैलीची चाचणी घेण्यात आली. यात ‘आयसीसी’च्या नियमानुसार १५ अंशांच्या कोनाचे त्याच्याकडून उल्लंघन होत असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तात्काळ निलंबित करण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 11th Dec 2018 रोजी प्रकाशित
गोलंदाजीच्या अवैध शैलीमुळे धनंजयावर निलंबनाची कारवाई
ब्रिस्बेन येथे धनंजयाच्या गोलंदाजीच्या शैलीची चाचणी घेण्यात आली.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 11-12-2018 at 05:05 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icc suspended sri lanka spinner akila dananjaya for illegal action