दुबई : भारताच्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट मोहिमेला प्रारंभ मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर २३ ऑक्टोबरला परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध लढतीने होणार आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक शुक्रवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केले.

गतवर्षी संयुक्त अरब अमिरातीत झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारतीय संघ ‘आयसीसी’च्या जागतिक स्पर्धामध्ये प्रथमच पाकिस्तानकडून हरला. अव्वल-१२ फेरीमधील भारताचा दुसरा सामना २७ ऑक्टोबरला अ-गटातून उपविजेत्या ठरलेल्या संघाशी होणार आहे. मग भारत ३० ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिकेशी, तर २ नोव्हेंबरला बांगलादेशशी सामना करणार आहे. ६ नोव्हेंबरला भारताचा अव्वल-१२ फेरीमधील अखेरचा सामना ब-गटातील विजेत्याशी होईल.

Along with Wanderers Kingsmead Newlands will host 2027 World Cup matches sport news
वॉण्डरर्ससह किंग्जमीड, न्यूलॅण्ड्सला २०२७च्या विश्वचषकाचे सामने
Mohammad Amir and Imad Wasim Returns to Pakistan National Team
फिक्सिंग, बंदी आणि निवृत्तीनंतर मोहम्मद आमिर पुन्हा पाकिस्तानच्या टी-२० संघात
babar azam became again captain of pakistan cricket team
बाबर पुन्हा पाकिस्तानचा कर्णधार
riyan parag
वेदनाशामक औषधे घेऊन रियान परागची निर्णायक खेळी!

दोन गटांचा समावेश असललेल्या अव्वल-१२ फेरीस २२ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड लढतीने प्रारंभ होईल. याच दोन सघांमध्ये गेल्या वर्षी ट्वेन्टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना रंगला होता. १ नोव्हेंबरला न्यूझीलंडचा संघ इंग्लंडशी लढत देईल. २०२१मध्ये न्यूझीलंडने उपांत्य सामन्यात इंग्लंडला नमवले होते.

भारताचे सामने

’ २३ ऑक्टोबर वि. पाकिस्तान दु. १.३० वा.

’ २७ ऑक्टोबर वि. अ-२ दु. १२.३० वा.

’ ३० ऑक्टोबर वि. दक्षिण आफ्रिका दु. ४.३० वा.

’ २ नोव्हेंबर वि. बांगलादेश दु. १.३० वा.

’ ६ नोव्हेंबर वि. ब-१ दु. १.३० वा.

अव्वल -१२ फेरी

’ गट-१ : ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, अफगाणिस्तान, अ-१, ब-२

’ गट-२ : भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, ब-१, अ-२

’ पहिली फेरी

अ-गट : श्रीलंका, नामिबिया, पात्र-१, पात्र-२

ब-गट : वेस्ट इंडिज, स्कॉटलंड, पात्र-३, पात्र-४