टी-२० विश्वचषक जिंकण्याचं भारतीय संघाचं स्वप्न धुळीस मिळालं आहे. इंग्लंडने उपांत्य फेरीमध्ये भारताचा १० गडी राखून पराभूत केल्याने अंतिम फेरीमध्ये इंग्लंडचा संघ पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. पाकिस्तान आणि इंग्लंडचा संघ मेलबर्नमधील मैदानावर १३ नोव्हेंबर रोजी चषकासाठी लढतील. दरम्यान भारताचा लाजिरवाणा पराभव झाल्याने पाकिस्तानी चाहत्यांकडून भारतीय संघाला ट्रोल केलं जात आहे. केवळ सर्वसामान्य पाकिस्तानी युझर्सचं नाही तर अनेक व्हेरिफाइड अकाऊंट्सवरुनही भारताला ट्रोल केलं जात आहे. मात्र या ट्रोलिंगदरम्यान एका पाकिस्तानी पत्रकाराने एक वादग्रस्त ट्वीट केलं असून भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांचा व्हिडीओ या ट्वीटमध्ये आहे.

नक्की वाचा >> Ind vs Eng: भारताचा दारुण पराभव! स्कोअरकार्ड पोस्ट करत शोएब अख्तर म्हणाला, “बिनबाद १७०… हा आकडा पुढील बराच काळ…”

भारताचा पराभव झाल्यानंतर इहितीशाम उल हक नावाच्या पाकिस्तानी पत्रकाराने ट्वीटरवरुन पंतप्रधान मोदींच्या एका व्हिडीओमधील १० सेकंदांची क्लिप पोस्ट केली आहे. हा व्हिडीओ शेअर करताना या पत्रकाराने, “पंतप्रधानांनी (मोदींनी भारतीय संघाला) मेसेज दिला आहे” अशी कॅप्शन दिली आहे. या पत्रकाराने पोस्ट केलेला व्हिडीओ हा मागील वर्षी ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला संघांला पदक मिळवता आलं नव्हतं त्यावेळेचा आहे.

नक्की वाचा >> Ind vs Eng: २८ चेंडूंमध्ये २७ धावा! ‘टी-२० मध्ये कसोटी खेळणाऱ्या रोहितचं अभिनंदन’; ‘हिटमॅन’च टार्गेटवर, चाहत्यांना संताप अनावर

इंग्लंडच्या महिला हॉकी संघाविरुद्ध २०२१ साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या कांस्य पदकाच्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारतीय महिला खेळाडूंचं कौतुक करण्यासाठी मोदींनी या संघातील खेळाडूंसोबत चर्चा केली होती. यावेळी मागील ४१ वर्षांमध्ये महिला हॉकीत सर्वोत्तम कामगिरी केलेल्या भारतीय महिला संघाला अश्रू अनावर झाले. पदकाच्या एवढ्या जवळ येऊनही चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागल्याने या महिला खेळाडून पंतप्रधान मोदींशी बोलताना रडू लगाल्या. त्यावेळी मोदींनी, “तू रडणं थांबावा. माझ्यापर्यंत आवाज येत आहे,” असं म्हटलं होतं. याच संवादाची क्लिप या पत्रकाराने शेअर केली आहे. इंग्लंडविरोधात भारत पराभूत झाल्यानंतर मोदी भारतीय संघाला रडू नका असं सांगत असल्याचं यामधून या पत्रकाराला सूचित करायचं आहे.

नक्की वाचा >> Ind vs Eng: “केएल राहुल म्हणजे सर्वात मोठा Fraud, महत्त्वाच्या सामन्यांमध्ये धावा काढत नाही आणि संघाला…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका संवेदनशील संवादाचा हा व्हिडीओ पाकिस्तानी पत्रकाराने भारतीय संघाला ट्रोल करण्यासाठी वापरला असून या व्हिडीओवरील कमेंट्स सेक्शनमध्ये पाकिस्तानी क्रिकेट चाहते भारतीय संघाला ट्रोल करत आहेत.