T20 World Cup IND vs ZIM Score Update: मेलबर्न क्रिकेट मैदानावर आज भारत विरुद्ध झिम्बाब्वेचा सामना रंगला आहे.टी २० विश्वचषकाच्या सुपर १२ सामन्यातील भारताचा हा शेवटचा सामना असणार आहे. खरंतर आज सकाळी नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केल्याने अगोदरच भारत विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत दाखल झाला आहे त्यामुळे आता झिम्बाम्बावे विरुद्ध सामना हा केवळ ग्रुप २ मधील टॉपचे स्थान टिकवण्याची लढाई असणार आहे. भारताने संपूर्ण विश्वचषकात संघांची बांधणी फार हलवलीच नव्हती आजच्या शेवटच्या सामन्यातही संघात केवळ एक बदल करण्यात आला आहे. आजच्या सामन्यात दिनेश कार्तिकच्या जागी यष्टीरक्षक म्हणून ऋषभ पंतची निवड करण्यात आली आहे.

भारत विरुद्ध झिम्बाम्बावे सामन्याच्या नाणेफेकीच्या वेळी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने दिनेश कार्तिकच्या जागी ऋषभ पंतला घेण्याचे खास कारण सांगितले आहे. रोहित म्हणाला की, ” ऋषभ पंत हा एकमेव असा खेळाडू आहे ज्याला संपूर्ण विश्वचषकात एकही खेळ खेळण्याची संधी मिळालेली नाही, आम्हाला त्याला ती संधी द्यायची होती म्हणूनच आज कार्तिकच्या ऐवजी ऋषभला प्लेइंग ११ मध्ये घेण्यात आले आहे”.

Betting on IPL cricket matches Raid in Salisbury Park
पुणे : आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टेबाजी; सॅलिसबरी पार्कात छापा
IPL 2024 Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore Match Updates in Marathi
Surya is Back: अशक्य वाटणारा फटका ‘मसल मेमरी’मुळे खेळतो! सूर्यकुमार यादवनं सांगितलं यशाचं कारण
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक
Virat Creates History at Chinnaswamy Stadium
RCB vs LSG : विराटने चिन्नास्वामी स्टेडियमवर रचला इतिहास! अनोखं शतक झळकावणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू

दरम्यान आज नाणेफेक जिंकून टीम इंडियाने प्रथम फलंदाजी निवडली आहे, हा संघाचा निर्णय असल्याचे सांगतांना रोहित शर्मा म्हणाला की, “फलंदाजी निवडण्यामागे खेळपट्टी हे कारण नसून आम्हाला फक्त गोलंदाजांना अधिक सराव मिळवून द्यायचा आहे”.

PAK vs BAN: पाकिस्तानचं नशीब पालटलं, शोएब अख्तरने दक्षिण आफ्रिकेसाठी केलं ट्वीट, “तुम्ही C नावाला ..”

आज टी २० विश्वचषकात सकाळपासूनची ही तिसरी महत्त्वाची मॅच आहे. सकाळी पार पडलेल्या नेदरलँड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात नेदरलँडने अनपेक्षितपणे बलाढ्य आफ्रिकेचा पराभव केला आहे. तर दुर्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेश विरुद्ध अगदी एकतर्फी विजय मिळवला. या दोन्ही सामन्यांमुळे आता भारत व पाकिस्तान ही उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत.

T20 World Cup Semi Final: पाकिस्तान उपांत्य फेरीसाठी पात्र पण बाबर आझमने वाढवली चिंता; विश्वचषकात फक्त…

टीम इंडिया (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग</p>