T20 World Cup Semifinals PAK vs BAN: T20 विश्वचषकाच्या सुपर १२ च्या अत्यंत महत्त्वपूर्ण सामन्यात पाकिस्तानने बांगलादेश वर ५ गडी राखून विजय मिळवला आहे. यासह पाकिस्तान आता टी २० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत दाखल झालेला दुसरा संघ ठरला आहे. बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता,मात्र पाकिस्तानी गोलंदाजांच्या समोर बांगलादेशची फलंदाजांची फळी फार यशस्वी झाली नाही परिणामी अवघ्या १२८ धावांचे टार्गेट पाकिस्तानला पूर्ण करायचे होते. बांगलादेशने २० षटकांत ८ बाद १२७ धावा केल्या होत्या. पाकिस्तानने १८. १ षटकात ५ विकेट गमावत १२८ धावा पूर्ण करत सामना जिंकला.

एकीकडे पाकिस्तानचा विजय झाला असला तरी पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम मात्र आता ट्विटरवर चांगलाच ट्रोल होत आहे. अनेक क्रिकेटप्रेमींनी पाकिस्तान स्वतःपेक्षा दक्षिण आफ्रिकेच्या योगदानानेच उपांत्य फेरीत जाऊ शकल्याचे म्हंटले आहे. ट्विटरवर सध्या बाबर आझमच्या नेतृत्वाविषयी ट्रोलिंग सुरु असताना अनेकांनी टी २० विश्वचषकात बाबरच्या धावांची आकडेवारीही मांडली आहे. बाबर आझमने यंदाच्या टी २० विश्वचषकात पाच सामन्यांमध्ये अत्यंत वाईट कामगिरी केल्याचे अनेकांनी ट्वीट केले आहे. खाली दिलेली आकडेवारी पाहता या ट्रोलर्सचे म्हणणे योग्य आहे असेच दिसून येत आहे.

ICC Womens t20 World Cup schedule Announced IND vs PAK match on 6 October
Women’s T20 World Cup 2024 चे वेळापत्रक जाहीर, भारत-पाकिस्तान सामना किती तारखेला होणार, जाणून घ्या
Thomas Cup Badminton Tournament Indian men team in quarterfinals
थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धा: भारतीय पुरुष संघ उपांत्यपूर्व फेरीत
Pakistan Cricket Board Appoint Gary Kirsten as T20 Format Coach T20 World Cup 2024
T20 WC पूर्वी, पाकिस्तानची मोठी खेळी; भारताला विश्वचषक जिंकून देणाऱ्या दिग्गजाची मुख्य प्रशिक्षक म्हणून केली नियुक्ती
Along with Wanderers Kingsmead Newlands will host 2027 World Cup matches sport news
वॉण्डरर्ससह किंग्जमीड, न्यूलॅण्ड्सला २०२७च्या विश्वचषकाचे सामने

बाबर आझम का होत आहे ट्रोल?

PAK vs BAN: पाकिस्तानचं नशीब पालटलं, शोएब अख्तरने दक्षिण आफ्रिकेसाठी केलं ट्वीट, “तुम्ही C नावाला ..”

बाबर आझमला टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये पाच सामन्यांमध्ये केवळ ३९ धावा करता आल्या आहे. बाबरचा स्ट्राईक रेट सुद्धा ६१. ९ इतकाच आहे. टी २० विश्वचषकात अत्यंत वाईट सुरुवात झाली होती मात्र सुपर १२ ह्या सामन्यांच्या शेवटाकडे पाकिस्तानचा खेळ सुधारला, दक्षिण आफिकेला हरवल्यावर कदाचित पाकिस्तानी संघाच्या आत्मविश्वासाला बूस्ट मिळाला असावा. आजच्या बांगलादेशच्या पराभवाने व त्याहीपेक्षा नेदरलँडच्या पराक्रमाने पाकिस्तानने सेमीफायनलमध्ये धडक दिली आहे.