क्रिकेट जगतातील एक महान फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर भारतीय चाहत्यांचा लाडका आहे. सचिनला अनेकवेळा प्रवास करताना तुम्ही पाहिले असेल. कधी चंद्रपुरातील ताडोबा व्याघ्रप्रकल्प असो की कोल्हापूरमधील श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे दिलेली श्री दत्त दर्शनासाठीची भेट. मात्र, सचिनच्या प्रवासाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. सचिन आपल्या मुलगा अर्जुनसोबत प्रवास करत आहे. यावेळी त्याने प्रवासात अर्जुनला चहा घेणार का असा प्रश्न विचारला. त्यावेळी अर्जुनची आलेली प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय आहे.

दोन दिवसांपूर्वी तो आणि मुलगा अर्जुन कोल्हापूरातील एका मित्राच्या शेतात मुक्काम ठोकले. तिथे त्याने तांबडा, पांढरा रस्सा आणि मटणा ताव मारला. दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजता उठून त्यांनी नृसिंहवाडी गाठली, तेथे दत्त दर्शन घेऊन बेळगावमार्गे तो गोव्याला रवाना झाला. प्रवास करताना आपला थकवा घालविण्यासाठी त्याने चहा घेणे पसंत केले. मात्र, हा चहा एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये न घेता थेट रस्त्याच्या कडेला असणाऱ्या टपरीवर घेतला. याचा व्हिडिओ सचिनने सोशल मीडियावर पोस्ट केलाय.

crow playing tic tac toe viral video
मालक अन् कावळ्यात रंगला फुल्ली-गोळ्याचा खेळ! पाहा कोण जिंकलं…. Video होतोय व्हायरल
This fan’s reaction after seeing Shubman Gill at hotel is viral Relatable much
“दिल मे बजी घंटी…टंग टंग टंग!” शुभमन गिलला समोर पाहताच चाहतीच्या काळजाचा चुकला ठोका! Viral Video एकदा बघाच
civil service servants vehicle with a board coming to wrong side
चक्क अधिकाऱ्याच्या गाडीने मोडला वाहतूक नियम! भर रस्त्यावर थांबवताच पेटला वाद, पाहा VIDEO
Mayank bowls the fastest ball in IPL 2024
LSG vs PBKS : बुमराह किंवा शमीला नव्हे, तर दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ खेळाडूला मयंक यादव मानतो आपला आदर्श

सचिनने सुट्ट्यांमध्ये त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो रस्त्याच्या कडेला चहा पिताना दिसत आहे. त्याच्या या व्हिडिओमध्ये तो चहासोबत टोस्टचा आनंद घेताना दिसत आहे. त्याचवेळी चहा पिल्यानंतर सचिनने दुकानदाराशी खास संवाद साधला आणि त्याच्यासोबत सेल्फी घेताना दिसला. या व्हिडिओ क्लिपला आतापर्यंत ९ लाखांहून अधिक यूजर्सनी लाइक केले आहे. याशिवाय ५००० पेक्षा जास्त कमेंट्स करण्यात आल्या आहेत. चायवाला नशीबवान आहे की त्याला ‘देव’ भेटला असे अनेकांनी लिहिले. सचिनला ‘क्रिकेटचा देव’ असेही म्हटले जाते.

हेही वाचा :   T20 World Cup 2022: पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा ३३ धावांनी केला पराभव, उपांत्य फेरीतील आव्हान अजूनही कायम

याच व्हिडिओमध्ये सचिनला शाळेत जाणारी मुलगी भेटली. सचिनने त्या मुलीने आपुलकीने चौकशी केली. त्याच्या या व्हिडिओमध्ये तो शाळेचा गणवेश घातलेल्या आणि खांद्यावर दप्तर लटकवलेल्या मुलीला भेटताना दिसत आहे. तो तिच्या पाठीवर कौतुकाची थाप मारतो. मुलीसोबत तिचे वडीलही दिसत आहेत. तेही सचिनला पाहून आनंदी झालेत.