एकदिवसीय महिला विश्वचषकासाठीच्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी केलीय. या सामन्यात भारतीय महिला संघाने पाकिस्तानला तब्बल १०७ धावांच्या फरकाने पराभूत केलंय. भारताने पाकिस्तानसमोर २४५ धावांचं तगडं आव्हान उभं केलं होतं. हे आव्हान गाठताना पाकिस्तानी संघाची चांगलीच दमछाक झाली. पाकिस्तानला अवघ्या १३७ धावा करता आल्या. भारतीय महिला संघाने पाकिस्तानविरोधातील विजयाची मालिका सुरुच ठेवल्याने या धडाकेबाज कामगिरीचं कौतूक केलं जातंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताने पाकिस्तानसमोर २४५ धावांचं आव्हान उभं केलं होतं. पाकिस्तान संघाने आव्हानाचा पाठलाग करण्याचा अटोकाट प्रयत्न केला. मात्र या संघाला फक्त १३७ धावाच करता आल्या. ४३ षटकांमध्ये पाकिस्तानचा पूर्ण संघ बाद झाला. पाकच्या एकाही खेळाडूने चांगली कामगिरी केली नाही. शिद्रा अमिनने ३० धावा केल्या. त्यानंतर एकाही खेळाडूने २४ पेक्षा जास्त धावा केल्या नाहीत. दहाव्या षटकात पाकचा पहिला गडी बाद झाला. त्यानंतर ७० धावांवर असतानाच पाकिस्तानचा अर्धा संघ तंबूत परतला होता.

मराठीतील सर्व Cricket बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icc womens world cup india vs pakistan india won by 107 runs prd
First published on: 06-03-2022 at 14:37 IST