पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डन २०२५ ची विजेती ठरली आहे. इगा स्वियातेकने विम्बल्डन २०२५ महिला एकेरीचे विजेतेपद जिंकून इतिहास रचला. सेंटर कोर्टवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात आठव्या मानांकित स्वियातेकने अमेरिकेच्या अमांडा अनिसिमोवाला ६-०, ६-० असे हरवून तिचं पहिलं विम्बल्डन विजेतेपद आणि एकूण सहावं ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावला आहे. इगाने सेमीफायनलमध्ये वर्ल्ड नंबर वन सबालेन्काला देखील पराभवाचा धक्का दिला होता.

इगा स्वियातेक ही विम्बल्डनचं जेतेपद जिंकणारी पोलंडची पहिली महिला खेळाडू ठरली आहे. माजी नंबर वन महिला टेनिसपटू इगा स्वियातकने आतापर्यंत कधीही विम्बल्डन जेतेपद जिंकले नव्हते. महिला एकेरी प्रकारातील हे तिचे सहावे ग्रँड स्लॅम जेतेपद आहे. याआधी तिने चार वेळा फ्रेंच ओपन आणि एकदा यूएस ओपन जिंकली होती. स्वियातेकने २०२०, २०२२, २०२३, २०२४ मध्ये फ्रेंच ओपन आणि २०२२ मध्ये यूएस ओपनचे जेतेपद आपल्या नावे केले.

स्वियातेकने केवळ ५७ मिनिटांत विजेतेपदाचा सामना जिंकला. ११४ वर्षांत पहिल्यांदाच अंतिम फेरीच्या सामन्यात प्रतिस्पर्धी महिला खेळाडू एकही सेट जिंकू शकली नाही. २४ वर्षीय स्वियातेकने अंतिम फेरीत एकतर्फी कामगिरी करत अनिसिमोवाला फक्त ५७ मिनिटांत हरवलं. १९११ नंतर विम्बल्डन महिला एकेरीच्या अंतिम फेरीत हा पहिलाच ६-०, ६-० असा एकतर्फी विजय आहे, ज्यामुळे हा स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात एकतर्फी जेतेपदाच्या सामन्यांपैकी एक बनला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संपूर्ण स्पर्धेत स्वियातेकने फक्त एकच सेट गमावला, यावरून तिच स्पर्धेतील कमालीचा फॉर्म दिसून येतो आणि ती या विजेतेपदाची खरी हकदार असल्याचंही यावरून दिसत आहे.