World Cup 2023 Mascot: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ (ICC World Cup 2023) यावेळी भारतीय भूमीवर आयोजित करण्यात येणार असून त्याची तयारी सुरू आहे. जगभरातील क्रिकेट चाहते या महाकुंभाची आतुरतेने वाट पाहत आहेत. गतविजेता संघ इंग्लंड आणि उपविजेता संघ न्यूझीलंड यांच्यातील लढतीने ५ ऑक्टोबरला स्पर्धेला सुरुवात होणार आहे. दरम्यान, शनिवारी एका कार्यक्रमादरम्यान शुभंकराचे अनावरण करण्यात आले, ज्याचा व्हिडीओ आयसीसीने शेअर केला आहे.

१२ वर्षांनंतर शुभंकर पुन्हा एकदा विश्वचषकात परतला आहे. यापूर्वी २०११ च्या विश्वचषकात स्टंपी (हत्ती) नावाने शुभंकर लाँच करण्यात आले होते. यानंतर २०१५ आणि २०१९ मध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकात शुभंकर लाँच करण्यात आले नाहीत. मात्र, त्यानंतर आयसीसी यावर्षीच्या विश्वचषकात पुन्हा एकदा शुभंकर घेऊन आले आहे.

ICC Annual Team Rankings Announced
वनडे आणि ट्वेन्टी२० प्रकारात टीम इंडिया अव्वल; आयसीसीची वार्षिक क्रमवारी जाहीर
Rohit Sharma Batting Loophole
“रोहित शर्मा बाद होण्याचा ‘हा’ पॅटर्न झालाय, तिथे शाहीन आफ्रिदी..”, विश्वचषकाआधी कर्णधाराला वासिम जाफरचा सल्ला
Deepika Kumari in the semi finals of the Archery World Cup sport
दीपिका कुमारी उपांत्य फेरीत; विश्वचषक तिरंदाजीत भारताची चार पदके निश्चित
Sanju Samson should be groomed as next T20 captain for India after Rohit says Harbhajan Singh
Team India : रोहितनंतर भारताचा टी-२० कर्णधार कोण होणार? हार्दिक-पंतकडे दुर्लक्ष करत हरभजनने सांगितले ‘हे’ नाव

आयसीसीने १९ ऑगस्ट रोजी गुरुग्राम येथे एका कार्यक्रमादरम्यान दोन शुभंकरांचे अनावरण केले. एक महिला गोलंदाज आहे, तर दुसरा पुरुष फलंदाज आहे. मात्र, अद्याप त्यांचे नाव देण्यात आलेले नाही. आयसीसीने चाहत्यांना त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर मतदानाद्वारे त्यांची नावे निवडण्यास सांगितले आहे. महिला आणि पुरुष दोन्ही खेळाडूंसाठी प्रत्येकी ३ पर्याय दिले आहेत. २७ ऑगस्टनंतर त्यांची नावे निवड करून कळवणार आहेत.

हेही वाचा: R. Ashwin: आर. अश्विनने वर्ल्डकपपूर्वी T20I मालिकेत न खेळलेल्या कोहली-रोहितचा केला बचाव; म्हणाला, “दोघेही सध्या त्यांच्या…”

त्याचवेळी, शुभंकराच्या अनावरण समारंभात भारताच्या पुरुष आणि महिला अंडर-१९ संघांचे कर्णधार यश धुल आणि शफाली वर्मा उपस्थित होते. विश्वचषकात शुभंकर लाँच करण्यामागचा मुख्य उद्देश लैंगिक (स्त्री-पुरुष) समानतेला चालना देणे हा आहे. शुभंकरांच्या अनावरणाबद्दल बोलताना आयसीसी इव्हेंटचे प्रमुख ख्रिस टेटली म्हणाले, “आम्हाला आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३च्या आधी आयसीसी शुभंकर जोडी लाँच करताना आनंद होत आहे. शुभंकरांची ही जोडी एकता आणि उत्कटतेचे प्रतीक आहे. महिला-पुरुषांच्या प्रतिनिधित्वासह, ते आपल्या गतिशील जगात लैंगिक समानतेच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचे प्रतीक आहेत.”

हेही वाचा: IND vs PAK: “पाकिस्तानची मिडल ऑर्डर ही भारतापेक्षा…”, माजी पाक खेळाडूने साधला टीम इंडियावर निशाना

शुभंकर खरेदी करण्याबाबत बोलताना ते पुढे म्हणतात, “पुढील पिढीच्या क्रिकेट चाहत्यांना जोडण्यासाठी ICC आणि क्रिकेटच्या मिळणाऱ्या प्राधान्याच्या अनुषंगाने, या शुभंकरांमध्ये मुलांना गुंतवून ठेवण्याची आणि त्यांचे मनोरंजन करण्याची ताकद आहे, ज्यामुळे आयसीसी इव्हेंट्सच्या पलीकडे या खेळावर आयुष्यभर प्रेम आहे. शुभंकर जोडी लीड-अप दरम्यान आणि स्पर्धेदरम्यान प्रसारणाद्वारे आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर चाहत्यांशी वैयक्तिकरित्या कनेक्ट होईल. चाहते गॉगल्स आणि विशेष शुभंकर थीम असलेली विविध प्रकारची क्रिटोव्हर्स उत्पादने खरेदी करू शकतात, जी ऑनलाइन आणि ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत.”