सिडनी वन-डे सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने भारताला ३४ धावांनी पराभूत केलं. कांगारुंनी दिलेलं २८९ धावांन आव्हान भारतीय संघ पेलवू शकला नाही. सलामीवीर रोहित शर्मा आणि मधल्या फळीत महेंद्रसिंह धोनीचा अपवाद वगळता एकही फलंदाज ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा सामना करु शकला नाही. धोनीने ५१ तर रोहित शर्माने १३३ धावांची खेळी केली. मात्र या सामन्यात DRS ची संधी गमावणं भारतीय संघाला चांगलंच महागात पडलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अवश्य वाचा –  IND vs AUS : धोनीने विक्रम रचला, मात्र खात्यात आणखी एका संथ खेळीची नोंद

जेसन बेहरनडॉर्फच्या ३३ व्या षटकात धोनी पायचीत असल्याचं अपील करण्यात आलं, जे पंचांनी उचलून धरत धोनीला बाद ठरवलं. दुर्दैवाने यावेळी भारताकडे DRS ची संधी उपलब्ध नव्हती. कारण अंबाती रायुडू बाद झाल्यानंतर भारताने ही संधी वाया घालवली. यावेळी धोनी माघारी परतल्यानंतर तिसऱ्या पंचांच्या पाहणीत धोनीला बाद ठरवण्यात आलेला चेंडू हा लेग स्टम्पच्या बाहेर पडत असल्याचं दिसतं होतं.

ऑस्ट्रेलियाकडून झाय रिचर्डसन आणि जेसन बेहरनडॉर्फने भेदर मारा केला. सध्या ३ सामन्यांच्या मालिकेत कांगारु १-० ने आघाडीवर आहेत. त्यामुळे आगामी दोन सामन्यांमध्ये बाजी मारुन कोणता संघ सामन्यात बाजी मारतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – IND vs AUS : एक धाव आणि धोनी मानाच्या पंक्तीत, वन-डे क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा पूर्ण

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus ms dhoni wrongly given out in a controversial manner at sydney
First published on: 12-01-2019 at 17:31 IST