भारताविरुद्ध 5 वन-डे सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाने सर्वांनाच आपली दखल घ्यायला भाग पाडलं आहे. दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावरील अंतिम वन-डे सामन्यातही ख्वाजाने 100 धावांची शतकी खेळी केली. वन-डे कारकिर्दीतलं ख्वाजाचं हे दुसरं शतक ठरलं. रांची येथे खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या वन-डे सामन्यातही ख्वाजाने 104 धावा पटकावल्या होत्या. या कामगिरीसह ख्वाजाने एक अनोखा विक्रम आपल्या नावे जमा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

5 वन-डे सामन्यांच्या मालिकेत भारताविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत उस्मान ख्वाजा पहिल्या स्थानी पोहचला आहे. उस्मानने न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला मागे टाकलंय.

भारताविरुद्ध 5 वन-डे सामन्यात ख्वाजाने अनुक्रमे 50, 38, 104, 91, 100 धावा पटकावल्या आहेत. 5 सामन्यांत मिळून ख्वाजाच्या नावावर 383 धावा जमा आहेत. 2014 साली विल्यमसनने 5 सामन्यात 361 धावा केल्या होत्या.

अवश्य वाचा – अजिंक्य रहाणेवर भारतीय संघ अन्याय करतोय – दिलीप वेंगसरकर

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus usman khwaja creates unique record in last odi
First published on: 13-03-2019 at 16:26 IST