Five Indian batsmen scored more than 50 runs : भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेत रोज नवनवीन विक्रम होत आहेत. प्रत्येक सामन्यात कोणता ना कोणता विक्रम होत आहे. मग ते गोलंदाजीत असो की फलंदाजीत, टीम इंडिया इंग्रजांवर पूर्णपणे वर्चस्व गाजवताना दिसत आहे. दरम्यान, इंग्लंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या धरमशाला कसोटीत भारतीय संघाने आणखी एक नवा विक्रम केला आहे. भारताच्या पाच अव्वल फलंदाजांनी ५० हून अधिक धावा केल्या आहेत. याआधी भारताने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात तीनदा अशी कामगिरी केली आहे, मात्र इंग्लंडविरुद्ध हा पहिल्यांदाच पराक्रम केला आहे.

टीम इंडियाच्या पाच अव्वल फलंदाजांनी ५० हून अधिक धावा –

धरमशाला येथे खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्याची खास गोष्ट म्हणजे भारतीय संघातील अव्वल ५ फलंदाजांनी किमान ५० पेक्षा जास्त धावांची इनिंग खेळली आहे. यापैकी रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी शतकी खेळीही खेळली आहे. याशिवाय यशस्वी जैस्वाल, सर्फराझ खान आणि देवदत्त पडिक्कल यांनीही आपापली अर्धशतके पूर्ण केली. यात मनोरंजक गोष्ट म्हणजे सर्फराज खान केवळ तिसरा सामना खेळत होता, तर देवदत्त पडिक्कलची ही पदार्पणाची कसोटी आहे. पडिक्कलने निर्भयपणे षटकार ठोकत आपले अर्धशतक पूर्ण केले.

IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: आशुतोष शर्माची आयपीएलमध्ये ऐतिहासिक कामगिरी, १७ वर्षांच्या इतिहासात ही कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
Rohit Sharma Unwanted Record In IPL 2024
MI vs CSK : रोहित शर्माच्या नावावर झाली नकोशा विक्रमाची नोंद, ‘या’ बाबतीत ठरला तिसरा खेळाडू
Rajasthan Royals Vs Royal Challengers Bangalore Match Updates in marathi
RR vs RCB : विराट कोहलीच्या नावावर झाली नकोशा विक्रमाची नोंद, आयपीएलमध्ये ‘हा’ विक्रम करणारा ठरला संयुक्त पहिला खेळाडू
Abhishek Sharma Breaks Chris Gayle and Sunil Narine's Record in SRH vs CSK Match
SRH vs CSK : अभिषेकने वादळी खेळीच्या जोरावर मोडला गेल-नरेनचा विक्रम, IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज

१९९८ साली पहिल्यांदा –

सर्वात पहिल्यांदा भारताने १९९८ मध्ये ही कामगिरी केली होती. जेव्हा ऑस्ट्रेलियन संघ कोलकातामध्ये समोर होता. या सामन्यात सलामीवीर म्हणून आलेल्या व्हीव्हीएस लक्ष्मणने ९५ धावा, नवज्योत सिंग सिद्धूने ९७ धावा, राहुल द्रविडने ८६ धावा, सचिन तेंडुलकरने ७९ धावा आणि तत्कालीन कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने १६३ धावांची दमदार खेळी साकारली होती. यानंतर सहाव्या क्रमांकावर खेळायला आलेल्या सौरव गांगुलीनेही ६५ धावा केल्या होत्या. भारताने हा सामना एक डाव आणि २१९ धावांनी जिंकला होता.

हेही वाचा – VIDEO: सर्फराझचा वुडच्या गोलंदाजीवर सचिन स्पेशल शॉट, धुलाई पाहून मार्क भडकला आणि…

१९९९ मध्ये दुसऱ्यांदा –

त्यानंतर १९९९ मध्ये पुन्हा त्याच पराक्रमाची पुनरावृत्ती झाली. यावेळी मोहालीत न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याच्या दुसऱ्या डावात हा विक्रम झाला. या सामन्यात देवांग गांधीने ७५, सदागोपन रमेशने ७३, राहुल द्रविडने १४४, कर्णधार सचिन तेंडुलकरने १२६ आणि सौरव गांगुलीने ६४ धावा केल्या होत्या. मात्र, हा सामना अनिर्णित राहिला होता.

२००९ मध्ये तिसऱ्यांदा –

यानंतर फार काळ असे घडले नाही, परंतु २००९ मध्ये पुन्हा असे घडले. यावेळी मुंबईत श्रीलंकेचा संघ समोर होता. या सामन्यात मुरली विजयने ८७ धावा, वीरेंद्र सेहवागने २९३ धावा, राहुल द्रविडने ७४ धावा, सचिन तेंडुलकरने ५३ धावा आणि व्हीव्हीएस लक्ष्मणने ६२ धावा केल्या होता. भारताने हा सामना एक डाव आणि २४ धावांनी जिंकला होता.

हेही वाचा – IND vs ENG: देवदत्तची पदार्पणात अर्धशतकाची बोहनी, आजारपणानंतर रणजीमधील कामगिरीने उजळलं नशीब

इंग्लंडविरुद्ध प्रथमच रचला इतिहास –

आता तब्बल १५ वर्षांनंतर पुन्हा तोच प्रकार घडला आहे. यावेळी यशस्वी जैस्वालने ५७ धावांची, रोहित शर्माने १०३, शुबमन गिलने ११०, देवदत्त पडिक्कलने ६५ आणि सर्फराझ खानने ५६ धावांची शानदार खेळी केली आहे. भारताने हा पराक्रम पहिल्यांदाच इंग्लंडविरुद्ध केल्याचे स्पष्ट झाले आहे. अशाप्रकारे इंग्लिश संघ यावेळी मागच्या पायावर ढकलला गेला आहे. पहिल्या डावाच्या जोरावर भारताला मोठी आघाडी मिळाली आहे. अशा स्थितीत भारताचा विजय जवळपास निश्चित दिसत आहे.