टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या खात्यात नव्या विक्रमाची नोंद केली आहे. इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात कोहलीने आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत १० हजार धावा पूर्ण केल्या आहेत. विराटने २१०व्या डावात हा पराक्रम केला. मात्र, त्याला सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडचा विक्रम मोडता आला नाही. पाच सामन्यांची कसोटी मालिका सध्या १-१ने बरोबरीत आहे. दुसऱ्या डावात विराटने ७ चौकारांसह ४४ धावा केल्या. त्याला पुन्हा शतकाने हुलकावणी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विराट कोहलीच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर हा त्याचा १२८ वा सामना आहे. त्याने ५२च्या सरासरीने १० हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. यामध्ये ३४ शतके आणि ३५ अर्धशतकांचा समावेश आहे. भारताकडून सर्वात जलद १० हजार प्रथम श्रेणी धावा करण्याचा विक्रम अजय शर्माच्या नावावर आहे. त्याने केवळ १६० डावांमध्ये हा पराक्रम केला.

 

हेही वाचा – ENG vs IND : हिटमॅन की ज्योतिषी? तीन वर्षापूर्वी रोहितनं केलेली भविष्यवाणी ठरलीय खरी!

टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी २१०व्या डावातच प्रथम श्रेणीत १० हजार धावांचा आकडा गाठला. इतर भारतीयांबद्दल बोलायचे झाल्यास, विजय मर्चंटने १७१ डाव, व्हीव्हीएस लक्ष्मणने १९४, सचिन तेंडुलकरने १९५ आणि राहुल द्रविडने २०८ डावांमध्ये ही कामगिरी केली होती. विराटला २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावता आलेले नाही.

टीम इंडियाने चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात १९१ धावा केल्या, तर इंग्लंडने २९० धावा केल्या. अशा प्रकारे यजमान इंग्लंडला ९९ धावांची आघाडी मिळाली आहे. पण टीम इंडियाला सामन्यात विजयी आघाडी घेण्यासाठी इंग्लंडला किमान ३०० धावांचे लक्ष्य द्यावे लागेल. टीम इंडिया २००७पासून इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकू शकलेली नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs eng virat kohli completed 10000 runs in first class cricket adn
First published on: 05-09-2021 at 17:26 IST