scorecardresearch

India vs Ireland : दीपक हुडाचे धडाकेबाज शतक; रोहित शर्मा, केएल राहुल अन् रैनाच्या क्लबमध्ये केला प्रवेश

अवघ्या सहा आंतरराष्ट्रीय टी २० सामन्यांचा अनुभव असलेल्या हुडाने ५७ चेंडूत १०४ धावा केल्या.

Deepak Hooda

भारतीय संघाचा नवीन धडाकेबाज फलंदाज दीपक हुडाने आयर्लंड विरुद्धच्या टी २० सामन्यात शतकी खेळी केली. अवघ्या सहा आंतरराष्ट्रीय टी २० सामन्यांचा अनुभव असलेल्या हुडाने ५७ चेंडूत १०४ धावा केल्या. त्याने आपल्या या खेळीत ९ चौकार आणि ६ षटकार फटकावले. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये भारतासाठी शतक झळकावणारा तो चौथा खेळाडू ठरला.

हुडाने १८व्या षटकातील पहिल्या चेंडूवर एकेरी धाव घेत शतक पूर्ण केले. त्यासाठी तो ५५ चेंडू खेळला. शतक पूर्ण करताच तो सुरेश रैना, रोहित शर्मा आणि केएल राहुलनंतर आंतरराष्ट्रीय टी २० सामन्यात शतक करणारा चौथा फलंदाज ठरला.

दीपक हुडाने संजू सॅमसनसोबत विक्रमी भागीदारी केली. या दोघांनी मिळून १७६ धावा जोडल्या. ही आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्ये कोणत्याही गड्यासाठी भारताची सर्वोच्च भागीदारी ठरली आहे. या दरम्यान संजू सॅमसनने देखील आंतराष्ट्रीय टी २० क्रिकेटमधील आपले पहिले अर्धशतक पूर्ण केले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ind vs ire indian batter deepak hooda slams maiden t20 i century against ireland vkk

ताज्या बातम्या