India vs Sri Lanka Match Highlights: भारत आणि श्रीलंका आशिया चषकातील तिसऱ्या सुपर-४ सामन्यात टीम इंडियाने ४१ धावांनी श्रीलंकन सेनेवर दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानवर मात केल्यानंतर अवघ्या २४ तासात भारतासमोर श्रीलंकेचे आव्हान होते. तब्बल १३ वनडे सलग जिंकलेल्या श्रीलंकेच्या विजयी रथाला थांबवण्यासाठी भारतीय संघाची अक्षरशः परीक्षा घेतली जाणार होती. पण या परीक्षेत १०० नंबरी गुण मिळवून भारताने श्रीलंकेवर विजय प्राप्त केला आणि थेट अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. १७ सप्टेंबर २०२३ ला आशिया कपची फायनल होणार आहे.

आता, भारताने अंतिम फेरीत स्थान निश्चित केल्यामुळे आणि बांगलादेश आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे, भारताच्या विरुद्ध अंतिम फेरीत पाकिस्तान की श्रीलंका खेळणार याविषयी सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. गतवर्षीच्या विजेत्या श्रीलंकेचे व भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचे फायनल पर्यंत पोहोचण्याचे मार्ग काय आहेत हे जाणून घेऊया..

पाकिस्तान की श्रीलंका, भारताच्या विरुद्ध अंतिम फेरीत कोण सामील होणार?

आशिया चषक स्पर्धेतील आपल्या अंतिम सुपर 4 सामन्यात श्रीलंकेची गुरुवारी बाबर आझमच्या पाकिस्तानशी गाठ पडणार आहे. सध्याच्या चॅम्पियन्सकडून प्रेमदासा स्टेडियमवर पाकिस्तानविरुद्ध खेळताना घरचे मैदान असल्याने सर्वाधिक फायदा होण्याची अपेक्षा आहे. या सेमीफायनलचा विजेता रविवारी आशिया कप फायनलमध्ये भारताविरुद्ध खेळेल.

श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान असा सामना झाला किंवा पावसामुळे रद्द झाला तर गणित काय असेल?

श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान ही एकाअर्थी आशिया चषकातील सेमीफायनलच म्हणता येईल कारण यातून जो संघ विजयी होणार आहे तोच भारताशी फायनलमध्ये भिडणार आहे. पण समजा ही, सेमीफायनल वॉशआउट झाल्यास, ज्या संघाचा निव्वळ रनरेट चांगला असेल तो भारत आशिया कप फायनलमध्ये सामील होईल. निव्वळ रन-रेटच्या बाबतीत श्रीलंकेची पाकिस्तानवर आघाडी आहे. दोन सामन्यांतून चार गुणांसह भारत सुपर ४टप्प्यात आघाडीवर आहे. मेन इन ब्लू पाठोपाठ श्रीलंकेचा क्रमांक लागतो, ज्यांचे गुण पाकिस्तानबरोबर आहे पण रनरेट मात्र काही पॉईंट्सने जास्त आहे.

श्रीलंकेसाठी पाऊस वरदान ठरू शकतो. उत्तम नेट-रन-रेट असल्याने श्रीलंका आता पाकिस्तानच्या एक पाऊल पुढे आहे. मात्र समजा सामना झाला आणि बाबरच्या संघाने श्रीलंकेचा पराभव केला तर मात्र १७ सप्टेंबरला पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तानचा थरार अनुभवायला मिळणार आहे. सुपर चार टप्प्यातील दारुण पराभवानंतर पाकिस्तान भारताच्या समोर येताना चांगलीच तयारी करून येऊ शकतो. अशावेळी रोहित शर्माच्या मेन इन ब्लुवर सुद्धा विशेष दडपण असणार आहे.

हे ही वाचा<< “मला वाटलं सचिन मेला, मी मुद्दाम..”, शोएब अख्तरची धक्कादायक कबुली! तेंडुलकर, धोनी विरुद्ध रचला डाव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान 50 षटकांच्या आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कधीही एकमेकांविरुद्ध खेळले नाहीत. यापूर्वी टीम इंडियाने सात वेळा आशिया चषक जिंकला आहे तर पाकिस्तानने दोन वेळा ट्रॉफी मायदेशी नेली आहे.