बांगलादेश येथे सुरू असलेल्या महिला आशिया चषक स्पर्धेतील तेरावा सामना आज भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात खेळला गेला. महिला आशिया चषकातील भारत पाकिस्तान महामुकाबल्यात पाकिस्तानने भारतावर १३ धावांनी मात केली. विशेष म्हणजे कालच थायलँडने पाकिस्तानचा पराभव केला होता आणि आज पाकिस्तानने भारताचा पराभव करत भारताला मोठा धक्का दिला. पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी १३८ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र भारताचा संपूर्ण डाव १२४ धावात संपुष्टात आला. पाकिस्तानकडून नाशरा संधूने सर्वाधिक ३ गडी बाद करत भारताला बॅकफूटवर ढकलले. तर सादिका इक्बाल निदा दार यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. फलंदाजीत निदा दारने नाबाद ५६ धावांची खेळी केली.

भारतीय संघ या स्पर्धेत तीन सामने जिंकला असून गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. आजचा सामना जरी भारताने गमावला तरी भारत गुणतालिकेत अव्वल आहे. पाकिस्तानने आजचा सामना जिंकून दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. तसेच ते उपांत्य फेरीत दाखल झाले. पाकिस्तानला मागील सामन्यात थायलंडने पराभूत करत चांगलाच धक्का दिला होता, त्यातून सावरत आणि स्पर्धेत आपले आव्हान कायम राखण्याच्या हेतूने ते मैदानात उतरणार आहेत. पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या शफाली वर्मा आणि किरण नवगिरे या दोघींना अंतिम अकरातून वगळले आहे. तर स्नेह राणाच्या जागी राधा यादवची संघात एंट्री झाली आहे. पाकिस्ताननेही दोन बदल केले आहेत. कायनात इम्तियाज आणि डायना बेग यांच्याजागी आयमान अन्वर आणि सादिया इक्बाल यांची अंतिम अकरामध्ये निवड केली आहे.

भारतीय संघाकडून फलंदाजी करताना रिचा घोष हिने सर्वाधिक धावा केल्या. तिने १३ चेंडूत २६ धावा चोपल्या. या धावा करताना तिने एक चौकार तीन षटकार मारले. तिच्याव्यतिरिक्त दयालन मेहलता (२०), स्मृती मंधाना (१७), दिप्ती शर्मा (१६), एस मेघना (१५) आणि कर्णधार हरमनप्रीत कौर (१२) यांनाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली. इतर एकाही फलंदाजाला १०धावांचा आकडाही पार करता आला नाही. यावेळी पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना नशरा संधू हिने सर्वाधिक गडी बाद केले. तिने ४ षटके गोलंदाजी करताना ३० धावा देत ३ बळी घेतले. तिच्याव्यतिरिक्त सदिया इकबाल आणि निदा दर यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. तसेच, तुबा हसन हिला एक बळी मिळाला.

पाकिस्तानची पॉवर प्लेमध्ये ३ बाद ३३ धावा अशी अवस्था झाली असताना कर्णधार बिसमाह मारूफ आणि निदा दार यांनी पाकिस्तानचा डाव सावरला. या दोघींनी अर्धशतकी भागीदारी रचत संघाला शतकी मजल मारून दिली. त्यांच्यात ५८ चेंडूत ७६ धावांची भागीदारी झाली. कर्णधार बिस्मा महारूफने ३५ चेंडूत ३२ धावा केल्या. निदा दारच्या अर्धशतकी खेळीने पाकिस्तानने शंभरी गाठली. तिने ३७ चेंडूत ५६धावा केल्या. भारतीय महिलांनी पाकिस्तानला १५० च्या आत रोखले. दीप्ती शर्मा आणि पूजा वस्त्राकरने पाकिस्तानच्या सलामीवीरांना माघारी धाडत अडचणीत आणले. त्या दोघींनी मिळून पाकिस्तानचा निम्मा संघ तंबूत पाठवला. त्यांना साथ देत वेगवान गोलंदाज रेणुका सिंगने एक गडी बाद केला.