IND vs SA 1st Test Day 3 Live Updates in Marathi: भारत आणि दक्षिण आफ्रिका पहिल्या कसोटीचा आज तिसरा दिवस आहे. दोन्ही संघांना ईडन गार्डन्सच्या मैदानावर पहिल्या दोन्ही डावांमध्ये २०० धावांचा आकडाही गाठता आलेला नाही. पहिल्या कसोटीत गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला आहे. याशिवाय भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिलला मानेला दुखापत झाल्याने तो या कसोटीत खेळताना दिसणार नाही.

ध्रुव जुरेल झेलबाद

ध्रुव जुरेलने वॉशिंग्टन सुंदरसह चांगली भागीदारी रचत भारताचा डाव सावरला होता. पण जुरेल मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात १३ धावांवर बाद झाला. यासह आता भारताला विजयासाठी ८९ धावांची गरज आहे.

लंचब्रेक

भारताने तिसऱ्या दिवशी लंचब्रेकपर्यंत ७ षटकांत २ विकेट्स गमावत १० धावा केल्या आहेत. यशस्वी जैस्वाल शून्यावर तर केएल राहुल १ धावा करत स्वस्तात माघारी परतले. मार्को यान्सनच्या भेदक गोलंदाजीवर भारताला दोन धक्के बसले. आता मैदानावर ध्रुव जुरेल व वॉशिंग्टन सुंदरची जोडी आहे. तर भारताला विजयासाठी ११४ धावांची गरज आहे.

भारताला पहिला धक्का

१२३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला खातंही न उघडता पहिला धक्का बसला आहे. यशस्वी जैस्वाल तिसऱ्या चेंडूवर विकेटच्या मागे झेलबाद झाला. यासह खातंही न उघडता भारताने पहिली विकेट गमावली आहे. शुबमन गिल फलंदाजीला उतरणार नसल्याने भारताचा फलंदाजी विभाग या ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर कशी फलंदाजी करणार यावर सर्वांच्या नजरा आहेत.

मोहम्मद सिराजच्या एका षटकात दोन विकेट्स

मोहम्मद सिराजने ५४व्या षटकात तिसऱ्या चेंडूवर हार्मरला क्लीन बोल्ड केलं आणि इतकंच काय तर स्टंपचे दोन तुकडे केले. यानंतर अखेरच्या चेंडूवर उत्कृष्ट यॉर्करसह केशव महाराजला पायचीत केलं. यासह दक्षिण आफ्रिकेचा संघ १५३ धावांवर सर्वबाद झाला. यासह दक्षिण आफ्रिकेने भारताला विजयासाठी १२३ धावांचं आव्हान दिलं आहे.

तेंबा बावुमाचं अर्धशतक

तेंबा बावुमाने १२४ चेंडूत अर्धशतकी खेळी करत संघाचा डाव सावरला आहे. यासह दक्षिण आफ्रिका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करत आहे.

बुमराहने संघाला मिळवून दिला ब्रेकथ्रू

कार्बिन बॉश व तेंबा बावुमाची भागीदारी झपाट्याने पुढे जात होती आणि भारतासाठी धोकादायक ठरत होती. तितक्यात बुमराहने ४८व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर बॉशला क्लीन बोल्ड केलं आणि संघाला महत्त्वाची विकेट मिळवून दिली. बॉश २५ धावा करत बाद झाला. यासह दक्षिण आफ्रिकेकडे १०५ धावांची आघाडी आहे.

दक्षिण आफ्रिकेची आघाडी १०० पार

दक्षिण आफ्रिकेची जोडी कार्बिन बॉश-तेंबा बावुमा यांनी भारतीय गोलंदाजीसमोर चांगली फलंदाजी करत आहे. यासह दक्षिण आफ्रिकेची आघाडी १०० पार पोहोचली आहे. दोघांनीही ४० धावांची भागीदारी रचली आहे. ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर दक्षिण आफ्रिकेने १३० अधिक धावांची आघाडी घेतल्यास भारतासाठी धावा करणं मोठं आव्हान ठरणार आहे.

शुबमन गिलच्या दुखापतीबाबत सविस्तर बातमी

शुबमन गिल मानेच्या दुखापतीनंतर हॉस्पिटमध्ये दाखल, उर्वरित कसोटीतून झाला बाहेर; BCCIने दिली महत्त्वाची अपडेट

कसोटीच्या दुसऱ्या दिवशी काय घडलं?

दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात १५९ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल भारताने १८९ धावा केल्या. यामुळे भारताला पहिल्या डावात ३० धावांची आघाडी मिळाली. दक्षिण आफ्रिका त्यांचा दुसरा डाव खेळण्यासाठी मैदानात उतरली तेव्हा त्यांनी दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस ७ गडी गमावून ९३ धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेसाठी चांगली गोष्ट म्हणजे त्यांचा कर्णधार तेंबा बावुमा अजूनही क्रीजवर आहे. दुसऱ्या दिवशी तेंबा बावुमा २९ धावांवर नाबाद आहे. ९३ धावा करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेकडे ६३ धावांची आघाडी आहे.