India vs South Africa 1st Test Match: दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर भारतीय फलंदाजांसाठी पहिला दिवस खूपच कठीण गेला. उसळत्या खेळपट्टीवर आफ्रिकन गोलंदाजांनी नेमके तेच केले ज्यासाठी ते ओळखले जातात. मात्र, अडचणीच्या काळात के.एल. राहुलच्या अर्धशतकाने भारताला काहीसा आधार दिला. आता माजी भारतीय खेळाडू सुनील गावसकर यांनी भारतीय संघाला सल्ला देत दुसऱ्या दिवशी संघाला काय करण्याची गरज आहे, हे सांगितले आहे.

पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यावर सुनील गावसकर यांनी के.एल. राहुलच्या अर्धशतकाचे कौतुक केले. ते म्हणाले, “भारताला आणखी २०-३० धावांची गरज आहे आणि जर दक्षिण आफ्रिकेने भारताला २६० किंवा त्याहून अधिक धावांवर बाद केले तर टीम इंडियाला संधी आहे.” गावसकर स्टार स्पोर्ट्सवर पुढे म्हणाले, “भारताला अजून दुसऱ्या दिवसाचा पहिला एक तास खेळून काढायचा आहे. जर भारताने तो खेळून काढला तर के.एल. राहुल शतक करू शकतो आणि टीम इंडिया २६० पेक्षा अधिक धावा करू शकते. मात्र, जर दक्षिण आफ्रिकेने ३०० किंवा त्याहून अधिक धावा केल्या तर ते आपल्यासाठी कठीण होईल.”

Elon Musk China Visit
भारताचा दौरा रद्द केल्यानंतर टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क अचानक चीनच्या दौऱ्यावर
Delhi Capitals vs Gujarat Titans Updates in Marathi
DC vs GT : ऋषभ-अक्षरच्या वादळी खेळीच्या जोरावर दिल्लीचा गुजरातवर ४ धावांनी निसटता विजय, मिलरचे अर्धशतक ठरले व्यर्थ
Operation Meghdoot, Siachen,
विश्लेषण : पाकिस्तानला चकवा देत सियाचिनवर कब्जा… थरारक ‘ऑपरेशन मेघदूत’ मोहीम कशी फत्ते झाली?
Share Market Sensex and Nifty
सेन्सेक्स आणि निफ्टीने रचला नवा इतिहास; बाजार भांडवल पहिल्यांदाच पोहोचले ४०० लाख कोटींवर

सामन्यात पहिल्या दिवशी काय झाले?

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताची सुरुवात काही खास नव्हती आणि कर्णधार रोहित ५ धावा करून रबाडाचा पहिला बळी ठरला. यानंतर यशस्वी जैस्वाल १७ धावा करून तंबूत परतला, पाठोपाठ शुबमन गिलही २ धावा करून बाद झाला. २४ धावांत तीन गडी गमावल्याने भारतीय संघ अडचणीत आला होता. अशा स्थितीत श्रेयस अय्यर आणि विराट कोहली यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाला संकटातून बाहेर काढले.

विराट ३८ धावा करून बाद झाला तर श्रेयसने ३१ धावा केल्या. रविचंद्रन अश्विनने ८ आणि शार्दुल ठाकूरने २४ धावांचे योगदान दिले. जसप्रीत बुमराहही एक धाव काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र, लोकेश राहुल एका बाजूला तंबू ठोकून उभा आहे, त्याने पहिल्या दिवसअखेर नाबाद ७० धावा करून खेळत आहे. त्याला मोहम्मद सिराजने चांगली साथ दिली आहे. दुसऱ्या दिवशी राहुल झटपट धावा करत शतक पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिका दोन विकेट्स घेत भारताला छोट्या धावसंख्येवर रोखण्याचा प्रयत्न करेल. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या आहेत. नांद्रे बर्जरने दोन तर मार्को जॅनसेनने एक गडी बाद केला.

हेही वाचा: IND vs SA 1st Test: सेंच्युरियनमध्ये सामन्यापूर्वी चक्क राहुल द्रविडने केली गोलंदाजी, सोशल मीडियायवर Video व्हायरल

२५० धावांचा बचाव करता येईल’

दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू शॉन पोलॉकने गावसकर यांच्या सल्ल्याचे पूर्ण समर्थन केले. तो म्हणाला की, “के.एल. राहुलची विकेट उद्या महत्त्वाचा असेल. भारताने जर आणखी ५०-६० धावा केल्या तर आफ्रिकेसाठी अवघड होईल. दक्षिण आफ्रिकेला लवकरच पुनरागमन करावे लागणार आहे. तुम्हाला सूर्यप्रकाश मिळताच खेळपट्टी बदलेल. या खेळपट्टीवर तुम्ही २५० धावांचा बचाव करू शकता.”