India vs South Africa 2nd Test Match Updates : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना केपटाऊनमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत यजमान संघाने दुसऱ्या डावात ३ बाद ६२ धावा केल्या असून सध्या भारतापेक्षा ३६ धावांनी पिछाडीवर आहे. या सामन्यात पहिल्या दिवशी एकूण २३ विकेट पडल्या, ज्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका पहिल्या डावात सर्वबाद झाले, तर प्रोटीज संघाने दुसऱ्या डावात ३ विकेट्स गमावल्या.

याआधी दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने लागला नाही आणि संघ पहिल्या डावात केवळ ५५ धावांत गारद झाला. यानंतर टीम इंडिया पहिल्या डावात १५३ धावांवर सर्वबाद झाला आणि ९८ धावांची आघाडी मिळाली. या सामन्याच्या पहिल्या दिवशी दोन्ही संघांचे गोलंदाज पूर्णपणे फलंदाजांवर वर्चस्व गाजवताना दिसले आणि फलंदाज संघर्ष करताना दिसले.

hamari Athapaththu 195 Runs Inning Helps Sri Lanka Chase Highest Record in Women ODI
SAW vs SLW: कितनी बडी बात? महिलांनीही पाडला एका दिवसात ६०० धावांचा पाऊस; दोघींनीच केल्या ३७९
Top 5 Oldest Player To Score A Century In IPL
IPL 2024 : रोहित शर्मासह ‘या’ पाच सर्वात वयस्कर खेळाडूंनी आयपीएलमध्ये झळकावलयं शतक, जाणून घ्या कोण आहेत?
Kolkata Knight Riders vs Delhi Capitals Match Highlights in Marathi
IPL 2024, DC vs KKR : कोलकाता नाईट रायडर्सचा मोठा विजय! दिल्ली कॅपिटल्सचा तब्बल १०६ धावांनी उडवला धुव्वा
Kolkata Knight Riders vs Delhi Capitals Match Updates in Marathi
DC vs KKR : केकेआरने रचला इतिहास! सुनील नरेनच्या वादळी खेळीच्या जोरावर दिल्लीसमोर ठेवले २७३ धावांचे लक्ष्य

दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात गमावल्या ३ विकेट्स –

या सामन्याच्या दुसऱ्या डावात पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दक्षिण आफ्रिकेने ३ गडी गमावून ६२ धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने दुसऱ्या डावात १२ धावा केल्या तर स्टब्सने एक धाव आणि जॉर्जीनेही एक धाव घेतली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा सलामीवीर एडन मार्करम नाबाद ३६ धावांवर तर डेव्हिड बेडिंगहॅम ७ धावांवर नाबाद होता. भारताकडून पहिल्या दिवशी मुकेश कुमारने दोन तर जसप्रीत बुमराहने एक विकेट घेतली.

हेही वाचा – ICC T20 : सूर्यकुमार यादवसह ‘या’ चार खेळाडूंना मिळाले आयसीसी टी-२० ‘क्रिकेटर ऑफ द इयर’साठी नामांकन

मोहम्मद सिराजने घेतल्या सर्वाधिक सहा विकेट्स –

दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ५५ धावांवर आटोपला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. मोहम्मद सिराजने सर्वाधिक सहा विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. दक्षिण आफ्रिकेचे दोनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. काइल व्हर्नने १५ आणि डेव्हिड बेडिंगहॅमने १२ धावांचे योगदान दिले. याशिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. एडन मार्करम (२४ धावा), डीन एल्गर (१७ धावा), टोनी डी जॉर्जी (१२ धावा), ट्रिस्टन स्टब्स (१२ धावा), मार्को जॅनसेन (० धावा), केशव महाराज (१ धाव), कागिसो रबाडा (१ धाव), नांद्रे बर्जर बाद (४ धावा).

हेही वाचा – IND vs SA : भारताने कसोटी क्रिकेटच्या १४७ वर्षातील सर्वात लाजिरवाणा विक्रम नोंदवला, अवघ्या ११ चेंडूंवर गमावल्या सहा विकेट्स

विराट कोहलीने केल्या सर्वाधिक ४६ धावा –

भारताचा पहिला डाव १५३ धावांवर आटोपला. भारताचे तीनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. कर्णधार रोहितने ३९ धावांची खेळी खेळली. शुबमन गिलने ३६ आणि विराट कोहलीने सर्वाधिक ४६ धावा केल्या. या तिघांव्यतिरिक्त फक्त लोकेश राहुलला खाते उघडता आले. त्याने आठ धावा केल्या. यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा आणि मुकेश कुमार यांना खाते उघडता आले नाही. मात्र, मुकेशला एकाही चेंडूचा सामना करावा लागला नाही. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी आणि नांद्रे बर्जर यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. भारताचा एक फलंदाज धावबाद झाला. पहिल्या डावाच्या आधारे भारताला ९८ धावांची आघाडी मिळाली.