भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा वनडे पार्लच्या मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने चांगली सुरुवात केली. राहुल-धवनने अर्धशतक भागीदारी केली. त्यानंतर विराट कोहली मैदानात आला. पण त्याला आपले खातेही उघडता आले नाही.

दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू एडन मार्करामच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या नादात शिखर धवन झेलबाद झाला. १२व्या षटकात भारतीय डावाची पहिली विकेट पडली. यानंतर किंग कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला. पुढच्याच षटकात कोहलीने केशव महाराजच्या गोलंदाजीवर कर्णधार टेंबा बावुमाकडे सोपा झेल दिला. त्याने ५ चेंडू खेळले पण खाते उघडण्यात अपयश आले. वनडे कारकिर्दीत विराट १४व्यांदा शून्यावर बाद झाला. मात्र एखाद्या फिरकीपटूने कोहलीला शून्यावर बाद करण्याची ही पहिलीच वेळ होती.

हेही वाचा – सचिन तेंडुलकरचा मोठा चाहता सुधीर कुमारला बिहार पोलीस ठाण्यात मारहाण!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विराट अपयशी ठरल्यानंतर ट्विटरवर DUCK हा ट्रेंड सुरू झाला. अनेकांनी विराटबाबत अनेक मीम शेअर केले. विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय शतकाची प्रतीक्षा आणखी वाढली आहे. कोहलीने नोव्हेंबर २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्ध कोलकाता डे-नाइट कसोटीत शेवटचे शतक झळकावले होते. त्यानंतर तो ६४ आंतरराष्ट्रीय डावांमध्ये शतक झळकावण्यात अपयशी ठरला आहे.