उप-कर्णधार रोहित शर्माने अखेरीस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४०० षटकार ठोकणारा रोहित शर्मा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. हा विक्रम करण्यासाठी रोहित शर्माला अवघ्या एका षटकाराची गरज होती, मात्र पहिल्या दोन सामन्यांमध्ये रोहित फलंदाजीत पुरता अपयशी ठरला. मात्र मुंबईच्या मैदानावर खेळत असताना अखेरीस रोहितने हा विक्रम केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या विक्रमी कामगिरीसोबत रोहित शर्माला दिग्गज खेळाडूंच्या पंगतीत स्थान मिळालं आहे. वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल आणि पाकिस्तानचा शाहीद आफ्रिदी यांनीच आतापर्यंत ४०० षटकारांचा टप्पा ओलांडला आहे. ख्रिस गेलच्या नावावर सध्या ५३४ तर शाहिद आफ्रिदीच्या नावावर ४७६ षटकार जमा आहेत. शेल्डन कोट्रेलच्या गोलंदाजीवर रोहितने खणखणीत षटकार खेचत या दिग्गज खेळाडूंच्या पंगतीत आपलं स्थान पक्क केलं आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs wi 3rd t20i rohit sharma becomes first batsman to reach 400 sixes mark in international cricket psd
First published on: 11-12-2019 at 19:13 IST