India W vs Australia W 3rd ODI: हरमनप्रीत कौरचा संघ मंगळवारी तिसऱ्या आणि शेवटच्या वन डेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध सन्मानासाठी लढणार आहे. पहिले दोन सामने गमावल्यानंतर भारतीय संघ ०-२ने पिछाडीवर आहे. टीम इंडियाने ही वन डे मालिका जरी गमावली असली तरी या सामन्यात विजय मिळवण्याचा हरमन ब्रिगेडचा प्रयत्न असेल. तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवत भारतीय भूमीवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग नऊ सामने पराभवाची मालिका खंडित करण्याचे आव्हान भारतीय संघासमोर असेल. भारतीय संघाने १६ वर्षांपूर्वी २००७ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर शेवटचा वन डे सामना जिंकला होता.

एकमेव कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियावर एकतर्फी विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ एकदिवसीय सामन्यात काही करिष्मा करेल असे वाटत होते, पण तसे झाले नाही. पहिल्या एकदिवसीय सामन्यात २८२ धावांची सर्वोच्च धावसंख्या करूनही हरले आणि दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सात झेल सोडल्यामुळे तीन धावांनी पराभव पत्करावा लागला. पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांची सकारात्मक बाजू म्हणजे जेमिमा रॉड्रिग्जची ८२, ४४ धावांची खेळी आणि रिचा घोषने ११३ चेंडूत खेळलेली ९६ धावांची खेळी. तिसर्‍या क्रमांकावर असलेल्या रिचाच्या फलंदाजी योजनांमध्ये प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांचा मोठा वाटा असल्याचे तिने तिच्या कामगिरीने दाखवून दिले आहे.

Hardik Pandya Slapped With Fine Of 12 Lakh rupees By BCCI
मुंबई इंडियन्सचा विजय सेलिब्रेट करताना हार्दिक पंड्याला धक्का; ‘या’ साठी बीसीसीआयने ठोठावला १२ लाखांचा दंड
Rohit Sharma Unwanted Record In IPL 2024
MI vs CSK : रोहित शर्माच्या नावावर झाली नकोशा विक्रमाची नोंद, ‘या’ बाबतीत ठरला तिसरा खेळाडू
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक
riyan parag
वेदनाशामक औषधे घेऊन रियान परागची निर्णायक खेळी!

हरमप्रीतचा फॉर्म भारतासाठी चिंतेचा विषय आहे

भारतीय संघासाठी चिंतेची बाब म्हणजे कर्णधार हरमनप्रीत कौरचा फॉर्म. तिला सर्व फॉरमॅटमध्ये गेल्या आठ डावांत केवळ तीन वेळा दुहेरी आकडा गाठता आला आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात केलेल्या ४९ धावा ही तिची सर्वोच्च धावसंख्या आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकमेव कसोटीत तिला दुसऱ्या डावात खातेही उघडता आले नाही, तर एकदिवसीय सामन्यात तिने केवळ ९ आणि ५ धावा केल्या. या मालिकेनंतर ऑस्ट्रेलियाबरोबर टी-२० मालिका होणार आहे. यासाठी हरमनप्रीत कौरचे फॉर्ममध्ये असणे आवश्यक आहे.

हेही वाचा: IND vs SA 2nd Test: केपटाऊनमध्ये टीम इंडिया मालिकेत बरोबर करणार का? जाणून घ्या हवामान आणि खेळपट्टी अंदाज

क्षेत्ररक्षणावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे

महिला संघाचा सर्वात कमकुवत दुवा म्हणजे त्यांचे क्षेत्ररक्षण. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सात झेल सोडल्यानंतर अमोल मुझुमदार यांनी या दिशेने संघाबरोबर आणखी काम करण्याची गरज असल्याचे मान्य केले होते. त्याचवेळी स्नेह राणा तिसऱ्या वन डेसाठी उपलब्ध असेल, असे मुझुमदार यांनी स्पष्ट केले आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तिची पूजा वस्त्राकरशी टक्कर झाली, त्यामुळे तिच्या डोक्याला दुखापत झाली आहे. या सामन्यात हरलीन देओल अष्टपैलू खेळाडू पर्याय म्हणून आली होती.

दीप्ती म्हणालीपराभूत होणारी मालिका तोडण्याचा प्रयत्न करेल

दुसऱ्या सामन्यात ३८ धावांत पाच विकेट्स घेणारी दीप्ती शर्मा म्हणते की, “संघ म्हणून कामगिरी पूर्वीपेक्षा चांगली झाली आहे. घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सततची पराभूत होण्याची मालिका खंडित करण्याचा आमचा प्रयत्न असेल.” ३६ चेंडूत २४ धावा केल्यामुळे दीप्तीला दुसरा एकदिवसीय सामना जिंकता आला नाही. तिचा बॅटिंग स्ट्राईक रेट सुधारण्याचाही प्रयत्न करत असल्याचे तिने सांगितले.

हेही वाचा: David Warner: डेव्हिड वॉर्नरला कारकिर्दीच्या शेवटच्या कसोटीपूर्वी मोठा धक्का, अनमोल ‘बॅगी ग्रीन कॅप’ गेली चोरीला

हीलीला मोठी धावसंख्या करता आली नाही

त्याच वेळी, दोन विजय मिळविल्यानंतर, अ‍ॅलिसा हिलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघ फॉर्ममध्ये आहे. हीलीने दोन्ही सामन्यात दुहेरी आकडा गाठला, पण मोठी धावसंख्या करण्यात तिला यश आले नाही. त्याचवेळी, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात, संघाने स्लिप आणि लाँग ऑफमध्ये दोन अतिशय सोपे झेल सोडले. हे दोन्ही झेल रिचा घोषने सोडले होते.

हेड टू हेड रेकॉर्ड

दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत ५२ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. भारताने केवळ १० सामने जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियाने ४२ सामने जिंकले आहेत. भारतीय महिला संघाने घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध २३ एकदिवसीय सामने खेळले आहेत. तो फक्त चार जिंकला. २००९ मध्ये पराभवाला सामोरे जावे लागले.

दोन्ही संघ पुढीलप्रमाणे आहेत.

भारत: यास्तिका भाटिया, स्मृती मानधना, रिचा घोष (यष्टीरक्षक), जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, हरलीन देओल, श्रेयंका पाटील, स्नेह राणा, रेणुका ठाकूर सिंग, शफाली वर्मा, सायका इशाक , तीतस साधू, मन्नत कश्यप.

ऑस्ट्रेलिया: फोबी लिचफील्ड, अ‍ॅलिसा हिली (यष्टीरक्षक/कर्णधार), अ‍ॅलिस पेरी, बेथ मूनी, ताहलिया मॅकग्रा, अ‍ॅशले गार्डनर, अ‍ॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेरेहम, अ‍ॅलाना किंग, किम गर्थ, डार्सी ब्राउन, मेगन शूट, जेस जोनासेन, हीदर ग्रॅहम.