भारतावर ५४ धावांनी मात; मालिकेत ४-१ अशी सरशी

वृत्तसंस्था, मुंबई : अ‍ॅशले गार्डनरची (३२ चेंडूंत नाबाद ६६ आणि २० धावांत २ बळी) अष्टपैलू कामगिरी आणि हिदर ग्रॅहमच्या (८ धावांत ४ बळी) भेदक गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने मालिकेतील अखेरच्या पाचव्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारतीय महिला संघाचा ५४ धावांनी पराभव केला. या विजयाने ऑस्ट्रेलिया महिला संघाने मालिका ४-१ अशी जिंकली. अ‍ॅशले गार्डनर सामन्यासह मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू ठरली.

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
MI vs CSK: आयपीएल २०२४ मध्ये ऋतु’राज’, मुंबईविरूद्ध विस्फोटक फलंदाजीसह ‘हा’ विक्रम करणारा पहिला भारतीय खेळाडू
Sunrisers Hyderabad vs Mumbai Indians IPL 2024 Live Score in Marathi
IPL 2024 SRH vs CSK Highlights: चेन्नईचा सलग दुसरा पराभव, हैदराबादने ६ विकेट्सने सहज जिंकला सामना
Sunil Narine's 500th T20 Match
RCB vs KKR : सुनील नरेनने आरसीबीविरुद्ध रचला इतिहास, टी-२०मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील चौथा खेळाडू
Rishabh becomes first player to play 100th match for Delhi
IPL 2024 : ऋषभ पंतने झळकावले अनोखे ‘शतक’, दिल्ली कॅपिटल्ससाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला खेळाडू

प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाची स्थिती १० षटकांत ४ बाद ६७ अशी बिकट झाली होती. त्यानंतर भारतीय गोलंदाजांना एकही गडी बाद करता आला नाही. गार्डनर आणि हॅरिस जोडीने पाचव्या गडय़ासाठी नाबाद १२९ धावांची भागीदारी करताना ऑस्ट्रेलियाला ५० षटकांत ४ बाद १९६ अशी भक्कम मजल मारून दिली. गार्डनरने आपल्या खेळीत ११ चौकार, तर हॅरिस ३५ चेंडूत सहा चौकार, चार षटकारांसह ६४ धावा करून नाबाद राहिली.

आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाचे गडी ठराविक अंतराने गडी बाद झाले. दीप्ती शर्माची ३४ चेंडूतील ५३ धावांची खेळी हाच काय तो भारताला मिळालेला दिलासा होता. ऑस्ट्रेलियाकडून सर्वात अखेरचा बदल म्हणून संधी मिळालेल्या हिदर ग्रॅहमने चमकदार कामगिरी करत भारताचा डाव अखेरच्या चेंडूवर १४२ धावांत संपुष्टात आला.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया : २० षटकांत ४ बाद १९६ (अ‍ॅशले गार्डनर नाबाद ६६, ग्रेस हॅरिस नाबाद ६४; देविका वैद्य १/२६, अंजली सरवानी १/३०) विजयी वि. भारत : २० षटकांत सर्वबाद १४२ (दीप्ती  शर्मा ५३, हरलीन देओल २४; हिदर ग्रॅहम ४/८, अ‍ॅशले गार्डनर २/२०)