India Dressing Room in IND vs ENG 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने शानदार कामगिरी करत रोमहर्षक विजय मिळवला. पाचव्या दिवशी इंग्लंड संघाला सर्वबाद करत भारताने ६ धावांनी विजय मिळवत मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली. अखेरच्या दिवशी इंग्लंडला ३५ धावांची आणि भारताला विजयासाठी ४ विकेट्सची आवश्यकता होती. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत संघाला जबरदस्त विजय मिळवून दिला.

भारत आणि इंग्लंड मालिका संपुष्टात आल्यानंतर एक रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टमधील माहितीनुसार भारताचा थ्रो डाउन स्पेशालिस्ट रघुने भारतीय ड्रेसिंग रूममध्ये ओव्हल कसोटीदरम्यान वातावरण कसं होतं याबद्दल वक्तव्य केलं आहे.

केनिंग्टन ओव्हल सामना हा मालिकेच्या निर्णयाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा होता. पण यादरम्यान पहिल्याच डावात भारतीय संघाने ३८ धावांवर २ विकेट्स गमावले होते. ड्रेसिंग रूममध्ये यामुळे एकदम शांतता पसरली होती. तितक्यात भारताचा थ्रो डाऊन स्पेशालिस्ट रघूने श्री शिव रूद्राष्टकम स्तोत्र ड्रेसिंग रूमच्या स्पिकरवर सुरू केलं, असं दैनिक जागरणच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये कोणी सुरू केलं श्री शिव रूद्राष्टकम स्तोत्र?

टीम इंडियाचा थ्रो डाउन स्पेशालिस्ट रघुने ड्रेसिंग रूममध्ये श्री शिव रुद्राष्टकम स्तोत्र लावले. त्यानंतर, ही प्रार्थना भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये ५ दिवस सतत लावण्यात आले आणि संघासाठी याचा चांगला फायदा झाला. या रूद्राष्टकम स्तोत्रामुळे ड्रेसिंग रूममधील वातावरणही सकारात्मक होण्यास मोठी मदत झाली.

भारताच्या संघाबरोबर प्रवास करणाऱ्या व्यक्तीने सांगितलं की, संघाने काही आधीपासूनच याचा प्लॅन केला होता. पण रूद्राष्टकम स्तोत्र एकदा सुरू केलं केल्यानंतर ते त्याचा वातावरणावर एक सकारात्मक आणि ऊर्जेने भरून गेलं.

एका भारतीय खेळाडूने सांगितलं की, “आम्ही प्रवास करताना आणि मैदानावर सराव करताना अनेक वेळा हनुमान चालीसा ऐकायचो. पण कसोटी मालिकेच्या शेवटच्या सामन्यात आम्ही पहिल्यांदाच ‘श्री शिव रुद्राष्टकम स्तुती’ ऐकलं. हे ऐकून आम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळाली आणि आम्ही सामना जिंकण्यासाठी आमचे सर्वोत्तम प्रयत्न केले असं मला वाटतं. आम्ही स्वतः आमच्या कामगिरीवर खूप खूश आहोत.”

१६ व्या शतकात तुलसीदासांनी रचलेले, श्री शिव रुद्राष्टकम हे भगवान शिवाची स्तुती करणारे संस्कृत स्तोत्र आहे. हे पारंपारिकपणे आध्यात्मिक शक्ती, एकाग्रता आणि नकारात्मक प्रभावांपासून संरक्षणासाठी पठण केलं जातं. श्रद्धेनुसार, सलग सात दिवस भक्तीने रुद्राष्टकमचे पठण केल्याने मोठे अडथळे आणि शत्रू दूर होण्यास मदत होते. असं म्हटलं जातं की भगवान रामाने रावणाशी झालेल्या अंतिम युद्धापूर्वी रामेश्वरम येथे विजयासाठी शिवाचे आशीर्वाद मागण्यासाठी ही स्तुती वाचली होती.