आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटनेने (फिफा) गुरुवारी जाहीर केलेल्या क्रमवारीत भारतीय फुटबॉल संघाची दोन स्थानांची घसरण झाली आहे. भारतीय संघ १४२ गुणांसह १६२व्या स्थानावर आहे. इराणने (४२) दोन स्थानांची झेप घेऊन आशियाई देशांमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलिया (५०) आणि दक्षिण कोरिया (५६) या संघांचा क्रमांक येतो. अर्जेटिनाने बेल्जियमकडून अव्वल स्थान हिरावून घेतले आहे, तर विश्वविजेत्या जर्मनीची पाचव्या स्थानी घसरण झाली आहे. चिली आणि कोलंबिया अनुक्रमे तिसऱ्या व दुसऱ्या स्थानावर आहे.
संग्रहित लेख, दिनांक 8th Apr 2016 रोजी प्रकाशित
भारतीय संघाची दोन स्थानांची घसरण
आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटनेने (फिफा) गुरुवारी जाहीर केलेल्या क्रमवारीत भारतीय फुटबॉल संघाची दोन स्थानांची घसरण झाली आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 08-04-2016 at 04:22 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India drop two places to be ranked 162nd in fifa