नवी दिल्ली : आशिया चषक पात्रता स्पर्धेतील शानदार कामगिरीचा फायदा भारतीय फुटबॉल संघाला गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या ताज्या ‘फिफा’ क्रमवारीत झाला आहे. दोन स्थानांची आगेकूच करीत भारतीय संघ क्रमवारीत १०४व्या स्थानी पोहोचला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

न्यूझीलंडचा संघ (१०३वे स्थान) भारताच्या एक स्थान पुढे असून आंतरखंडीय पात्रता फेरीत कोस्टा रिकाकडून ०-१ असे पराभूत झाल्याने त्यांना ‘फिफा’ विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवता आली नव्हती. आशिया फुटबॉल महासंघाच्या सदस्यांमध्ये भारत १९व्या स्थानी आहे, तर इराणचा संघ अव्वल (‘फिफा’ क्रमवारी २३वे स्थान) स्थानावर आहे. ब्राझीलने क्रमवारीत आपले अग्रस्थान कायम ठेवले असून बेल्जियमचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. अर्जेटिनाने एका स्थानाच्या सुधारणेसह तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे, तर फ्रान्सची चौथ्या स्थानी घसरण झाली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India move up two places in fifa rankings zws
First published on: 24-06-2022 at 02:35 IST