चेन्नई : आगामी विश्वचषक क्रिकेट स्पध्रेत भारत आणि इंग्लंड हे विजेतेपद जिंकू शकतील. गोलंदाजांच्या कामगिरीच्या बळावर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला जेतेपदावर नाव कोरता येईल, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राने व्यक्त केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताविरुद्ध नुकत्याच झालेल्या मालिकेत विजय मिळवून ऑस्ट्रेलियाने विश्वचषकातील विजेतेपदाच्या आशा उंचावल्या आहेत, असे ४९ वर्षीय मॅकग्राने सांगितले.

‘‘इंग्लंड आणि भारत हे विश्वचषकातील दोन सर्वोत्तम संघ आहेत. वेस्ट इंडिजमध्ये इंग्लंडला झगडायला लागले, तर भारताने ऑस्ट्रेलियाकडून हार पत्करली. त्यामुळे या दोन संघांमधील रंगत अधिक वाढेल,’’ असे मॅकग्रा म्हणाला.

‘‘इशांत शर्मा हा अतिशय अनुभवी गोलंदाज आहे. अनुभवी भुवनेश्वर कुमारनेही अप्रतिम गोलंदाजी करायला हवी. मोहम्मद शमी सध्या सातत्याने बळी मिळवत आहे. जसप्रीत बुमराकडे असामान्य गुणवत्ता असू यॉर्कर्स आणि रीव्हर्स स्विंग करण्याची क्षमताही आहे. त्यामुळे भारताला विश्वविजेतेपदासाठी गोलंदाजांनी कामगिरी उंचावण्याची आवश्यकता आहे,’’ असे मॅकग्राने सांगितले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India or england will win the world cup says glenn mcgrath
First published on: 22-03-2019 at 03:39 IST