हांगझो : महाराष्ट्राचा जगज्जेता ओजस देवताळे आणि अभिषेक वर्मा या भारतीयांमध्येच आशियाई क्रीडा स्पर्धेत कम्पाऊंड प्रकारातील पुरुष विभागाची अंतिम लढत रंगणार आहे. त्याच वेळी महिला वैयक्तिक प्रकारात ज्योती सुरेखा वेन्नम अंतिम फेरीत पोहोचली असून, महाराष्ट्राची पहिली महिला जागतिक विजेती आदिती स्वामी कांस्यपदकाची लढत खेळणार आहे. यामुळे भारताची तिरंदाजी प्रकारातील तीन पदके निश्चित झाली आहेत.

यापूर्वी भारताने २०१४ आशियाई स्पर्धेत याच प्रकारात तीन पदकांची कमाई केली होती. या कामगिरीशी या वेळी बरोबरी झाली आहे. या प्रकारात या वेळी अजून सात प्रकार शिल्लक असल्यामुळे हांगझो येथे भारतीय तिरंदाजीत सर्वोत्तम कामगिरी नोंदवणार यात शंका नाही. या वेळी भारताचे तिरंदाज एकूण १० प्रकारांत पदकांच्या शर्यतीत असून, यातील चार पदके वैयक्तिक प्रकारातील आहेत.

Indian Team Announced for World Cup 2024
T20 World Cup 2024 : साई-अभिषेकसह IPL 2024 गाजवणाऱ्या ‘या’ पाच खेळाडूंना वर्ल्डकपसाठी टीम इंडियात मिळाले नाही स्थान
aman
पुरुष कुस्तीगिरांबाबत नाराजी, पण ऑलिम्पिक पात्रतेसाठी पूर्वीचाच संघ!
jyoti surekha vannam
ज्योतीची सुवर्ण हॅट्ट्रिक;  विश्वचषक तिरंदाजीमध्ये कम्पाऊंड प्रकारात भारताला पाच पदके
international monetary fund praises india for maintaining fiscal discipline in election year
निवडणूक वर्षातही भारताकडून वित्तीय शिस्त कायम; आंतरराष्ट्रीय़ नाणेनिधीकडून कौतुक; आघाडीच्या देशांमध्ये स्थान कायम राहणार

हेही वाचा >>>Asian Games 2023: बजरंग पुनियासाठी पदकाचा मार्ग झाला खडतर, कुस्तीचे सामने ग्रीको-रोमन प्रकाराने होणार सुरू

दोन महिन्यांपूर्वी जागतिक विजेतेपद मिळवल्यानंतर ओजसची पुन्हा एकदा कोरियाच्या सातव्या मानांकित यांग जाएवोनशी उपांत्य फेरीत गाठ पडली होती. मात्र, या वेळीदेखील ओजसने प्रतिस्पर्धी यांगला संधीच दिली नाही. साताऱ्यात सराव करणाऱ्या ओजसने आपल्या १५ संधीपैकी प्रत्येक संधीवर १० गुणांचा वेध घेत कोरियन प्रतिस्पर्धीवर १५०-१४६ असा विजय मिळवला. ओजसची सुवर्ण लढत भारताच्याच अभिषेक वर्माशी होणार आहे. अभिषेकनेदेखील कोरियाच्या अग्रमानांकित जू जाएहूनचा १४७-१४५ असा पराभव केला.

महिलांच्या वैयक्तिक प्रकारात ज्योतीने आपला संपूर्ण अनुभव पणाला लावून आपलीच सहकारी साताऱ्याची आदिती स्वामीचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. ज्योतीला आता आपल्या पदकाचा रंग सोनेरी करण्याची संधी निर्माण झाली आहे. ज्योतीची गाठ कोरियाच्या सो चाएवोनशी पडणार आहे. त्याच वेळी आदिती इंडोनेशियाच्या रैथ झिलिझाटी फाधलीशी कांस्यपदकाची लढत खेळेल.