scorecardresearch

Premium

IND vs AUS 3rd T20 Highlights : मॅक्सवेलच्या शतकापुढे ऋतुराजची खेळी ठरली व्यर्थ! ऑस्ट्रेलियाने भारताचा ५ गडी राखून उडवला धुव्वा

India vs Australia 3rd T20Highlights : पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले आहे. परंतु तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने मॅक्सवेल आणि वेडच्या वादळी खेळीच्या जोरावर भारताचा पाच गडी राखून धुव्वा उडवला.

India vs Australia 3rd T20 Highlights Updates in Marathi
ग्लेन मॅक्सवेलच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा शानदार विजय (फोटो – एक्स)

India vs Australia 3rd T20 Highlights , 28 November 2023 : ग्लेन मॅक्सवेलने गुवाहाटी येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात वादळी शतक (नाबाद १०४ धावा) झळकावले. त्याने अवघ्या ४८ चेंडूत ८ चौकार आणि ८ षटकार मारून ऑस्ट्रेलियाला सामना जिंकून दिला. कांगारूंना विजयासाठी शेवटच्या दोन षटकात ४३ धावा करायच्या होत्या. यानंतर १९व्या षटकात २० धावा आल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाला विजयासाठी शेवटच्या षटकात २१ धावा करायच्या होत्या आणि प्रसिध कृष्णाच्या हातात चेंडू होता. मात्र, मॅक्सवेलने अशक्य ते शक्य करून दाखवले. ऑस्ट्रेलियाने शेवटच्या चेंडूवर २२३ धावांचे लक्ष्य गाठले.

England vs India match preview,
मायदेशातील वर्चस्व राखण्याची संधी! फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर भारत इंग्लंड चौथी कसोटी आजपासून
India Vs England 3rd Test Rohit Sharma Video Viral
IND vs ENG : रोहित शर्माने बूट उचलला, अन् जैस्वाल-सर्फराझसह इंग्लंडचे खेळाडू फिरले माघारी, VIDEO व्हायरल
Umpire stops Australia Wicket celebrations no appeal For run out Rule For Not Out AUS vs WI T20I Highlights Second Win After IND vs AUS
ऑस्ट्रेलियाचं सेलिब्रेशन पंचांनी थांबवलं; बाद असूनही ‘त्याला’ घोषित केलं नाबाद, क्रिकेटचा हा नियम काय सांगतो?
IND vs AUS U19 icc
IND vs AUS ICC U19 WC : भारताची ‘आदर्श’ झुंज अपयशी, विश्वविजेतेपदाचं स्वप्न भंगलं; ऑस्ट्रेलिया ठरली अव्वल!
Live Updates

IND vs AUS 3rd T20 Highlights Today : गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आले होते. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात मॅक्सवलेच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारताचा पाच गडी राखून पराभव केला.

22:54 (IST) 28 Nov 2023
IND vs AUS 3rd T20 : ऑस्ट्रेलियाचा भारतावर ५ गडी राखून विजय

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा मंगळवारी पार पडला. गुवाहाटीतील बारसापारा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ग्लेन मॅक्सवेलच्या वादळी शतकाच्या जोरावर भारताचा ५ गडी राखून पराभव केला. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ऋतुराज गायकवाडच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला २२३ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने २० व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर २२५ धावा करत विजय नोंदवला.

22:23 (IST) 28 Nov 2023
IND vs AUS 3rd T20 : ऑस्ट्रेलियाला 24 चेंडूत 65 धावांची गरज

16 षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 5 विकेटवर 158 धावा आहे. ग्लेन मॅक्सवेल 35 चेंडूत 5 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 69 धावांवर खेळत आहे. त्याच्यासोबत कर्णधार मॅथ्यू वेड चार चेंडूत दोन धावांवर खेळत आहे. ऑस्ट्रेलियाला आता 24 चेंडूत 65 धावा करायच्या आहेत.

https://twitter.com/usmansays44/status/1729544033859441009

22:18 (IST) 28 Nov 2023
IND vs AUS 3rd T20 : ग्लेन मॅक्सवेलने २८ चेंडूत झळकावले अर्धशतक

ग्लेन मॅक्सवेलने आपल्या टी-20 कारकिर्दीतील 11वे अर्धशतक 28 चेंडूत झळकावले. त्याने अर्शदीप सिंगच्या चेंडूवर रिव्हर्स लॅपवर षटकार ठोकत आपले अर्धशतक पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाला शेवटच्या पाच षटकात 78 धावांची गरज आहे.

https://twitter.com/Humayun_Kobir91/status/1729541859628978220

22:08 (IST) 28 Nov 2023
IND vs AUS 3rd T20 : ऑस्ट्रेलियाची पाचवी विकेट पडली, टीम डेव्हिड बाद

रवी बिश्नोईने टीम डेव्हिडला बाद करून ऑस्ट्रेलियाच्या आशांना मोठा धक्का दिला आहे. डेव्हिड 14व्या षटकात 134 धावांवर शून्यावर बाद झाला. 14 षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 5 विकेटवर 136 धावा आहे. ग्लेन मॅक्सवेल 25 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांसह 48 धावांवर खेळत आहे. कॅप्टन मॅथ्यू वेड त्याच्यासोबत आहे.

https://twitter.com/its_umair96/status/1729540057521152136

22:04 (IST) 28 Nov 2023
IND vs AUS 3rd T20 : ऑस्ट्रेलियाला बसला चौथा झटका!

ऑस्ट्रेलियाला 13व्या षटकात 128 धावांवर चौथा धक्का बसला. अक्षर पटेलने मार्कस स्टॉइनिसला सूर्याकरवी झेलबाद केले. त्याला 21 चेंडूत 17 धावा करता आल्या. स्टॉइनिसने मॅक्सवेलसोबत 41 चेंडूत 60 धावांची भागीदारी केली. आता ऑस्ट्रेलियाला 42 चेंडूत 95 धावांची गरज आहे. सध्या मॅक्सवेल आणि टीम डेव्हिड क्रीजवर आहेत.

22:00 (IST) 28 Nov 2023
IND vs AUS 3rd T20 : मॅक्सवेल आणि स्टॉइनिस यांच्यात अर्धशतकी भागीदारी

ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टॉइनिस यांच्यात ३६ चेंडूत ५० धावांची भागीदारी केली आहे. १२ षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात ११८ धावा आहे. स्टॉइनिस १६ आणि मॅक्सवेल ३३ धावांवर खेळत आहेत.

https://twitter.com/_FarhanMansuri/status/1729538199398289466

21:46 (IST) 28 Nov 2023
IND vs AUS 3rd T20 : ऑस्ट्रेलियाची धावसंख्या शंभरी पार

10 षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात 105 धावा आहे. ग्लेन मॅक्सवेल 13 चेंडूत 27 धावांवर खेळत आहे. तर मार्कस स्टॉइनिस 12 चेंडूत 9 धावांवर खेळत आहे. ऑस्ट्रेलियाला आता 60 चेंडूत विजयासाठी 118 धावा करायच्या आहेत.

https://twitter.com/_FarhanMansuri/status/1729532980207726684

21:40 (IST) 28 Nov 2023
IND vs AUS 3rd T20 : प्रसिध कृष्णाच्या षटकात आल्या २३ धावा

प्रसिध कृष्णाने 8 वे षटक टाकले. या षटकात एकूण 23 धावा आल्या. ग्लेन मॅक्सवेलने या षटकात दोन चौकार आणि दोन षटकार मारले. 8 षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात 96 धावा आहे. ग्लेन मॅक्सवेल 10 चेंडूत 25 धावांवर खेळत आहे. मार्कस स्टॉइनिस त्याच्यासोबत खेळपट्टीवर आहे.

https://twitter.com/_FarhanMansuri/status/1729531844742517081

21:35 (IST) 28 Nov 2023
IND vs AUS 3rd T20 : ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का! बिश्नोईने इंग्लिसला केले बोल्ड

ऑस्ट्रेलियाने सातव्या षटकात 68 धावांवर तिसरा विकेट गमावला आहे. रवी बिश्नोईने जोश इंग्लिसच्या गोलंदाजीवर ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का दिला. इंग्लिशला सहा चेंडूंत दोन चौकारांच्या जोरावर केवळ 10 धावा करता आल्या.

https://twitter.com/DeshrajH/status/1729531555540795440

21:27 (IST) 28 Nov 2023
IND vs AUS 3rd T20 : आवेश खानने ट्रॅव्हिस हेडला बाद करत ऑस्ट्रेलियाला दिला दुसरा धक्का

वेगवान गोलंदाज आवेश खानने ट्रॅव्हिस हेडला रवी बिश्नोईकरवी झेलबाद करून ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का दिला. ट्रॅव्हिस हेडला 18 चेंडूत 35 धावा करून बाद झाला. सहा षटकानंतर ऑस्ट्रेलियाने तीन बाद 68 धावा केल्या आहेत.

https://twitter.com/CricWatcher11/status/1729528649424961718

21:22 (IST) 28 Nov 2023
IND vs AUS 3rd T20 : पाच षटकानंतर स्ट्रेलियाची धावसंख्या एक बाद ५६ धावा

5 षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 1 विकेटवर 56 धावा आहे. अर्शदीप सिंगने पाचव्या षटकात भारताला पहिले यश मिळवून दिले. 5 षटकांनंतर ट्रॅव्हिस हेडने 16 चेंडूत 31 धावा आणि जोश इंग्लिसने 2 चेंडूत 5 धावा केल्या आहेत.

https://twitter.com/cricchronicle1/status/1729528605640942078

21:20 (IST) 28 Nov 2023
IND vs AUS 3rd T20 : आरोन हार्डी १६ धावा करुन बाद

वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने सलामीवीर आरोन हार्डीला यष्टिरक्षक इशान किशनकरवी झेलबाद करून ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. हार्डी 16 धावा करून बाद झाला.

21:10 (IST) 28 Nov 2023
IND vs AUS 3rd T20 : ट्रेव्हिस हेडकडून ऑस्ट्रेलियाच्या डावाची वादळी सुरुवात

ट्रेव्हिड हेडने येताच आक्रमक फलंदाजीला सुरुवात केली. 2 षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 25 धावा आहे. सर्व धावा ट्रेव्हिड हेडने केल्या आहेत. त्याने 12 चेंडूत 25 धावांपर्यंत मजल मारली आहे. एरॉन हार्डी खाते न उघडता हजर आहे.

20:59 (IST) 28 Nov 2023
IND vs AUS 3rd T20 : भारताने ऑस्ट्रेलियासमोर ठेवले २२३ धावांचे लक्ष्य

तिसर्‍या टी-20 सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी सामना करताना 223 धावांचे लक्ष्य दिले आहे. शेवटच्या षटकात एकूण 30 धावा झाल्या. भारताकडून ऋतुराज गायकवाडने 57 चेंडूत नाबाद 123 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक ठोकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. त्याने 13 चौकार आणि 7 षटकार मारले. त्याच्यासह तिलक वर्मा 31 धावांवर नाबाद माघारी परतला.

https://twitter.com/BCCI/status/1729520258099368146

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाने 20 षटकांत 3 गडी गमावून 222 धावा केल्या. ऋतुराज गायकवाडने 57 चेंडूत 123 धावांची नाबाद खेळी केली. याशिवाय तिलक वर्मा 24 चेंडूत 31 धावा करून नाबाद राहिला. चौथ्या विकेटसाठी दोघांमध्ये 59 चेंडूत 141 धावांची नाबाद भागीदारी झाली. ऑस्ट्रेलियाने 20 व्या षटकात ग्लेन मॅक्सवेलला गोलंदाजी दिलीक. या षटकात ऋतुराजने तीन षटकार आणि एक चौकार मारला. भारताने 20 व्या षटकात 30 धावा केल्या. टीम इंडियाने शेवटच्या पाच षटकात 79 धावा केल्या. मालिकेत पुनरागमन करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला 223 धावा कराव्या लागतील.

https://twitter.com/BCCI/status/1729520682802008106

भारताकडून टी-20 मध्ये शतक झळकावणारा ऋतुराज आठवा भारतीय ठरला. त्याच्या आधी रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, शुभमन गिल, विराट कोहली, दीपक हुडा आणि सुरेश रैना यांनी ही कामगिरी केली आहे. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मध्ये शतक झळकावणारा ऋतुराज पहिला भारतीय ठरला. ऋतुराजने आपल्या खेळीत 13 चौकार आणि सात षटकार मारले. त्याचवेळी तिलकने आपल्या डावात चार चौकार मारले. त्याआधी यशस्वी जैस्वाल सहा धावा करून बाद झाला, तर इशान किशन खाते न उघडता बाद झाला. यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने ऋतुराजसोबत तिसऱ्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी केली. सूर्या 29 चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 39 धावा करून बाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून केन रिचर्डसन, अॅरॉन हार्डी आणि जेसन बेहरेनडॉर्फ यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

20:18 (IST) 28 Nov 2023
IND vs AUS 3rd T20 : ऋतुराज गायकवाडने ३१ चेंडूत झळकावले अर्धशतक

21 चेंडूत 21 धावांवर खेळणाऱ्या गायकवाडने सूर्यकुमार बाद झाल्यानंतर उग्र फॉर्म स्वीकारला. त्याने 31 चेंडूत अर्धशतक झळकावले. या काळात गायकवाडच्या बॅटमधून 9 चौकार आले. आता टिळक वर्माने 11 चेंडूत तीन चौकारांसह 17 धावा केल्या आहेत. 14 षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात 132 धावा आहे.

19:59 (IST) 28 Nov 2023
IND vs AUS 3rd T20 : भारताची तिसरी विकेट पडली, सूर्यकुमार यादव बाद

भारताने 11व्या षटकात 81 धावांवर तिसरा विकेट गमावला आहे. स्फोटक फलंदाजी करणाऱ्या सूर्यकुमार यादवला अॅरॉन हार्डीने विकेटच्या मागे झेलबाद केले. टी-20 इंटरनॅशनलमधील हार्डीची ही पहिली विकेट आहे.

https://twitter.com/BCCI/status/1729506408637382976

19:49 (IST) 28 Nov 2023
IND vs AUS 3rd T20 : सूर्यकुमार आणि ऋतुराज यांच्यात अर्धशतकी भागीदारी

सूर्यकुमार यादव आणि ऋतुराज गायकवाड यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 39 चेंडूत 50 धावांची भागीदारी झाली. 9 षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात 74 धावा आहे. सूर्या 34 तर गायकवाड 20 धावांवर खेळत आहे.

https://twitter.com/BCCI/status/1729504182229475579

19:46 (IST) 28 Nov 2023
IND vs AUS 3rd T20 : तन्वीर संघाच्या षटकातून ११ धावा आल्या

सातवे षटक लेगस्पिनर तनवीर संघाने टाकले. या षटकात सूर्यकुमार यादवने दोन चौकार मारले. सात षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात 54 धावा आहे. सूर्यकुमार 18 चेंडूंत 2 चौकार आणि 2 षटकारांसह 23 धावांवर खेळत आहे. तर गायकवाड 13 चेंडूंत दोन चौकारांसह 11 धावांवर खेळत आहे.

https://twitter.com/BCCI/status/1729504003476648299

19:42 (IST) 28 Nov 2023
IND vs AUS 3rd T20 : सूर्यकुमारने नॅथन एलिसच्या षटकात लगावले दोन उत्तुंग षटकार

पाचव्या षटकात सूर्यकुमार यादवने त्याच्या सहीचे फटके मारत दोन षटकार ठोकले. नॅथन एलिसच्या या षटकात एकूण 13 धावा आल्या. 5 षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात 39 धावा आहे. सूर्यकुमार 13 तर गायकवाड 06 धावांवर खेळत आहेत.

19:24 (IST) 28 Nov 2023
IND vs AUS 3rd T20 : भारताची दुसरी विकेट पडली, इशान किशन बाद

तिसऱ्या षटकात अवघ्या २४ धावांवर भारताने दुसरी विकेट गमावली. इशान किशन खाते न उघडताच बाद झाला. केन रिचर्डसनच्या गोलंदाजीवर तो ऑफ साइडवर झेलबाद झाला. आता गायकवाड आणि सूर्यकुमार क्रीजवर आहेत.

https://twitter.com/BCCI/status/1729496922556366919

19:16 (IST) 28 Nov 2023
IND vs AUS 3rd T20 : टीम इंडियाला दमदार सुरुवातीनंतर बसला पहिला धक्का!

केन रिचर्डसनने पहिले षटक टाकले. या षटकात एकूण १४ धावा आल्या. यशस्वी जैस्वालने एक चौकार मारला, तर गायकवाडने एक चौकार मारला. एका षटकानंतर भारताची धावसंख्या एकही विकेट न गमावता १४ धावा होती. यानंतर दुसऱ्या षटकात यशस्वी जैस्वालच्या रूपाने भारताला पहिला धक्का बसला. यशस्वीला वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फने यष्टिरक्षक मॅथ्यू वेडच्या हाती झेलबाद केले. यशस्वी ६ चेंडूत ६ धावा करून बाद झाला.

18:47 (IST) 28 Nov 2023
IND vs AUS 3rd T20 : पाहा दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन

भारत : ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, आवेश खान, प्रसीध कृष्णा.

https://twitter.com/BCCI/status/1729488362330022164

ऑस्ट्रेलिया: ट्रॅव्हिस हेड, आरोन हार्डी, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक/कर्णधार), केन रिचर्डसन, नॅथन एलिस, तन्वीर संघा, जेसन बेहरेनडॉर्फ.

18:44 (IST) 28 Nov 2023
IND vs AUS 3rd T20 : ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय

तिसऱ्या टी-२० मध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल केले आहेत. मॅथ्यू शॉर्टच्या जागी ट्रॅव्हिस हेडचे संघात पुनरागमन झाले आहे. त्याचवेळी शॉन अॅबॉटच्या जागी जेसन बेहरेनडॉर्फ आणि अॅडम झाम्पाच्या जागी केन रिचर्डसन खेळत आहे.

18:13 (IST) 28 Nov 2023
IND vs AUS 3rd T20 : आजचा सामना तिलकसाठी महत्त्वाचा असणार

सलग १२ वा टी-२०आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या तिलक वर्मासाठी हा सामना महत्त्वाचा असेल. गेल्या दोन सामन्यांत त्याला फलंदाजीची फारशी संधी मिळाली नाही. त्याने दोन डावात केवळ १२ चेंडू खेळले आहेत. एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या भारतीय संघाचा सदस्य श्रेयस अय्यर रायपूर आणि बंगळुरू येथे होणाऱ्या चौथ्या आणि पाचव्या सामन्यांसाठी संघात पुनरागमन करत आहे. अशा स्थितीत प्लेइंग इलेव्हनमध्ये तिलकच्या जागी श्रेयसचे पुनरागमन होणे अपेक्षित आहे. शेवटच्या दोन सामन्यांमध्ये ऋतुराज गायकवाडच्या जागी तो संघाचा उपकर्णधारही असेल. त्यामुळे या सामन्यात तिलककडून मोठ्या खेळीची अपेक्षा केली जात आहे.

17:46 (IST) 28 Nov 2023
IND vs AUS 3rd T20 : साडेसहाला भारत आणि ऑस्ट्रेलिया सामन्याची होणार नाणेफेक

पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांत बारसापारा स्टेडियम, गुवाहाटी येथे खेळला जाणार आहे. या सामन्याला संध्याकाळी सात वाजता सुरुवात होणार आहे. त्तत्पूर्वी दोन्ही संघांच्या कर्णधारांमध्ये साडेसहाला नाणेफेकीचा कार्यक्रम पार पडेल.

17:19 (IST) 28 Nov 2023
IND vs AUS 3rd T20 : विश्वचषक खेळलेले सहा ऑस्ट्रेलियन खेळाडू टी-२० मालिकेतून बाहेर

भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेतील शेवटच्या तीन सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या संघात अनेक बदल केले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या वनडे विश्वचषक 2023 विजेत्या संघातील सहा सदस्यांना विश्रांती देण्यात आली आहे. हे खेळाडू बरेच दिवस क्रिकेट खेळत होते आणि थकव्याचा परिणाम त्यांच्या कामगिरीवर दिसत होता. ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, जोश इंग्लिस आणि सीन अॅबॉट ऑस्ट्रेलियाला परतणार आहेत. ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अॅडम झाम्पा याआधीच स्टीव्ह स्मिथसोबत ऑस्ट्रेलियाला परतला आहे.

16:58 (IST) 28 Nov 2023
IND vs AUS 3rd T20 : दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

भारत: ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, प्रसीध कृष्णा.

ऑस्ट्रेलिया: मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (कर्णधार/यष्टीरक्षक), शॉन अॅबॉट, नॅथन एलिस, अॅडम झाम्पा, जेसन बेहरेनडॉर्फ/तनवीर संघा.

16:39 (IST) 28 Nov 2023
IND vs AUS 3rd T20 : बारसापारा स्टेडियममधील टी-२० सामन्याची आकडेवारी

बारसापारा क्रिकेट स्टेडियम २०१२ मध्ये बांधण्यात आले होते, येथे ४० हजार प्रेक्षकांची आसन व्यवस्था आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात येथे पहिला आंतरराष्ट्रीय टी-२० सामना झाला. आत्तापर्यंत येथे ३ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने झाले आहेत, त्यापैकी एक अनिर्णित होता.

16:16 (IST) 28 Nov 2023
IND vs AUS 3rd T20 : गुवाहाटीमध्ये टीम इंडियाचा रेकॉर्ड काय आहे?

भारतीय संघाने या मैदानावर आतापर्यंत तीन टी-२० सामने खेळले आहेत. २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध येथे पराभवाला सामोरे जावे लागले होते. टीम इंडियाला सहा वर्षांनंतर बदला घ्यायला आवडेल. २०२२ मध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १६ धावांनी विजय मिळवला होता. २०२० मध्ये श्रीलंकेविरुद्ध एक सामना खेळवला जाणार होता, परंतु नाणेफेक झाल्यानंतर पावसामुळे हा सामना होऊ शकला नाही.

15:51 (IST) 28 Nov 2023
IND vs AUS 3rd T20 : फलंदाजांना खेळपट्टीची मदत मिळेल

गुवाहाटीची खेळपट्टी फलंदाजांना मदत करेल अशी अपेक्षा आहे. अशा स्थितीत या सामन्यातही धावांचा पाऊस पडू शकतो. या मैदानावर अनेक चौकार आणि षटकार मारले जातात. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील शेवटच्या टी-२० मध्ये येथे ४०० हून अधिक धावा झाल्या. चाहत्यांना आणखी एक रोमहर्षक सामना पाहायला मिळू शकतो.

https://twitter.com/BCCI/status/1729350217177424034

15:49 (IST) 28 Nov 2023
IND vs AUS 3rd T20 : टीम इंडियाच्या मालिका विजयात पाऊस घालणार खोडा?

Accuweather नुसार, २८ नोव्हेंबर रोजी गुवाहाटीमध्ये दिवसा ढगाळ हवामान राहण्याची अपेक्षा आहे. आकाश ढगांनी झाकले जाण्याची शक्यता आहे. संध्याकाळी रिमझिम पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.०० वाजता खेळ सुरू होईल. त्यावेळी कमाल तापमान २१ अंश सेल्सिअस राहण्याची अपेक्षा आहे आणि खेळ संपल्यानंतर भारतीय वेळेनुसार रात्री १०:३०च्या सुमारास तापमान १९ अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल. अशा परिस्थितीत प्रेक्षकांना आणखी एक रोमांचक सामना पाहता येणार आहे.

https://twitter.com/BCCI/status/1729172441673699561

India vs Australia 3rd T20 Live Updates in Marathi

IND vs AUS 3rd T20 Highlights Today : पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले आहे. परंतु तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने मॅक्सवेल आणि वेडच्या वादळी खेळीच्या जोरावर भारताचा पाच गडी राखून धुव्वा उडवला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Web Title: India vs australia 3rd t20 live score in marathi barsapara stadium in guwahati vbm

First published on: 28-11-2023 at 15:45 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×