पीटीआय, रायपूर

भारतीय संघ शुक्रवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या ट्वेन्टी-२० सामन्यात मैदानात उतरेल, तेव्हा संघाचे लक्ष्य मालिका विजयाचे असणार आहे. या सामन्यात ग्लेन मॅक्सवेल खेळणार नसल्याने त्याच्या अनुपस्थितीत युवा गोलंदाजांकडून अखेरच्या षटकांमध्ये कामगिरी उंचवण्याचे लक्ष्य असेल.

Rohit Sharma poor IPL Record on Birthday He Gets Out Early
IPL 2024: रोहित शर्माला वाढदिवसादिवशी नेमकं होतं तरी काय? वेगळ्याच विक्रमाची नावे केली नोंद
LSG beat MI by 4 Wickets
IPL 2024: लखनऊने अखेरीस मिळवला विजय, मुंबई इंडियन्सचं प्लेऑफसाठीचं गणित अवघड
Mayank Yadav injured again in LSG vs MI match
IPL 2024: लखनऊ संघाचं टेन्शन वाढलं, मयंक यादवला पुन्हा दुखापत; षटकही पूर्ण न करता सोडावे लागले मैदान
India T20 WC Matches Schedule and Timings
T20 World Cup मधील टीम इंडियाचे सामने भारतीय वेळेनुसार किती वाजता खेळवले जाणार? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

गोलंदाजांच्या कामगिरीवर लक्ष

तिसऱ्या सामन्यात भारताचे गोलंदाज अखेरच्या दोन षटकांत ४३ धावा करण्यापासून ऑस्ट्रेलियाला रोखू शकले नाहीत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने २२३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सामना जिंकला. प्रसिध कृष्णाने चार षटकांत ६८ आणि अखेरच्या षटकात २१ धावा दिल्या. दीपक चाहरचे पुनरागमन झाले असून तो नव्या चेंडूने गोलंदाजी करण्यास सक्षम आहे. तसेच, मुकेश कुमारही संघात दाखल झाला आहे. प्रसिध व आवेश खान यांच्या गोलंदाजीत फारशी विविधता पाहायला मिळाली नाही. त्याचा फायदा प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांनी घेतला. तसेच, दोन्ही गोलंदाजांना प्रभावी ‘यॉर्कर’ टाकता आला नाही. श्रेयस अय्यरचे पुनरागमन झाल्याने तिलक वर्माला बाहेर बसावे लागू शकते. यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, इशान किशन, कर्णधार सूर्यकुमार यादव व रिंकू सिंह यांची निवड जवळपास निश्चित आहे.

हेही वाचा >>>रोहित-विराटला द. आफ्रिका दौऱ्यावरही विश्रांती देण्याचं कारण काय? बीसीसीआयनं दिलं स्पष्टीकरण…

ऑस्ट्रेलियाची मदार फलंदाजांवर

स्टीव्ह स्मिथ, अ‍ॅडम झ्ॉम्पा मायदेशी परतले आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ट्वेन्टी-२० विश्वचषकापूर्वी कार्यभार व्यवस्थापन व तंदुरुस्ती लक्षात घेता अनेक आघाडीच्या खेळाडूंना संघात स्थान दिले नाही. आता भारतीय गोलंदाजांसमोर टिम डेव्हिड, जॉश फिलीप आणि बेन मॅकडरमॉट यांचे आव्हान असेल.

वेळ : सायं. ७ वा.

थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८-१, जिओ सिनेमा.