scorecardresearch

Premium

रोहित-विराटला द. आफ्रिका दौऱ्यावरही विश्रांती देण्याचं कारण काय? बीसीसीआयनं दिलं स्पष्टीकरण…

भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर सूर्यकुमार यादव टीम इंडियाच्या टी-२० संघाचं नेतृत्व करणार आहे, तर के.एल. राहुलकडे एकदिवसीय संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे.

Rohit Sharma Virat Kohli
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा (PC : @mufaddal_vohra/X)

India Tour of South Africa Squad Announced : ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० सामन्यांची मालिका संपल्यावर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठीच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. गुरुवारी बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी भेट घेऊन संघाला अंतिम रूप दिलं. भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा १० डिसेंबरपासून सुरू होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने तीन टी-२०, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. टी-२० मालिकेने या दौऱ्याची सुरुवात होईल. उभय संघांमधील पहिला सामना १० डिसेंबर रोजी खेळवला जाईल.

बीसीसीआयने टी-२० संघाची कमान सूर्यकुमार यादवकडे सोपवली आहे. तर के. एल. राहुलकडे एकदिवसीय संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. राहुल एकदिवसीय संघाचा नवा कर्णधार आणि पुढील विश्वचषकासाठी बीसीसीआयच्या योजनेचा एक भाग असू शकतो. भारताच्या कसोटी संघाचं नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे.

Mohammad Amir Praises Virat Video Viral
VIDEO : विराटच्या नेतृत्वाखाली खेळायला आवडेल की बाबरच्या? पाकिस्तानच्या गोलंदाजाने दिले चकीत करणारे उत्तर
Umpire stops Australia Wicket celebrations no appeal For run out Rule For Not Out AUS vs WI T20I Highlights Second Win After IND vs AUS
ऑस्ट्रेलियाचं सेलिब्रेशन पंचांनी थांबवलं; बाद असूनही ‘त्याला’ घोषित केलं नाबाद, क्रिकेटचा हा नियम काय सांगतो?
india vs england ks bharat believes indian team will make strong comeback in second test
इंग्लंडच्या आक्रमणाला प्रत्युत्तर देण्यासाठी नव्या योजनांसह सज्ज! दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाच्या दमदार पुनरागमनाचा भरतला विश्वास
amitesh kumar New Police Commissioner pune crime challenges
पुण्याच्या नवीन पोलीस आयुक्तांसमोर ‘ही’ नवी आव्हाने

रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोन वरिष्ठ खेळाडू दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-२० संघात नसतील. सध्या चालू असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेतून या दोन खेळाडूंनी विश्रांती घेतली आहे. विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर रोहित आणि विराटच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून निवृत्तीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अशातच द. आफ्रिकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेतही हे दोन खेळाडू नसल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे.

हे ही वाचा >> द. आफ्रिका दौऱ्यातही विराट, रोहितला विश्रांती; एकदिवसीय संघाची धुरा के. एल. राहुलकडे, टी-२०चे नेतृत्व सूर्यकुमारकडे

बिसीसीआयने एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, रोहित आणि विराटने मर्यादित षटकांच्या खेळातून विश्रांती देण्याची विनंती केली होती. त्यानुसार या दोन्ही खेळाडूंचा एकदिवसीय आणि टी-२० संघात समावेश केलेला नाही. तर मोहम्मद शमीच्या दुखापतीवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे त्याचा संघातील समावेश हा त्याच्या फिटनेसवर अवलंबून आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bcci answer on why rohit sharma virat kohli not included in white ball cricket for india tour of south africa asc

First published on: 30-11-2023 at 21:23 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×