अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने मेलबर्न येथील बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ८ गडी राखून विजय मिळवला. पहिल्या कसोटी सामन्यातील दारुण पराभवाचा बदला या सामन्यात भारतीय संघानं घेतला. भारताचा भेदक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाच्या तगड्या फलंदाजांनी नांगी टाकली. बॉक्सिंग डे कसोटी सामन्यातील शतकी खेळीमुळे रहाणेला सामनावीर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. विजायनंतर अजिंक्य रहाणेनं केलेलं ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

आणखी वाचा- मराठमोळ्या रहाणेचा बहुमान, मानाचं Mullagh Medal पटकावणारा पहिला खेळाडू

बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात विजय मिळवत भारतीय संघानं बॉर्डर गावसकर मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. या ऐतिहासिक विजयानंतर अजिंक्य रहाणेनं एक फोटो पोस्ट केला आहे. त्या फोटोसोबत एक सुंदर असं कॅप्शनही पोस्ट केलं आहे. रहाणेचं हे ट्विट सध्या चर्चेचा विषय आहे. रहाणेच्या या ट्विटने सर्व नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. अजिंक्य रहाणेनं बॉक्सिंग डे कसोटी सामना जिंकल्यानंतर केलेल्या ट्विटमध्ये संपूर्ण भारतीय संघ दिसत आहे. यामध्ये सपोर्ट स्टापपासून खेळाडू आणि नेट गोलंदाजाचाही समावेश आहे. या फोटोवर अजिंक्य रहाणेनं ट्विट करत म्हटलं आहे की, ‘स्पेशल टीम, स्पेशल विजय’ रहाणेचं हे ट्विट व्हायरल झालं आहे.

आणखी वाचा- विराटलाही न जमलेली गोष्ट अजिंक्यने करुन दाखवली, ७ वर्षांनी धोनीच्या कामगिरीशी बरोबरी

आणखी वाचा- कर्णधार अजिंक्यचा मेलबर्नमध्ये डंका, धोनीसोबत मानाच्या पंगतीत स्थान

विजयानंतर अजिंक्य रहाणेचं सर्वच स्तरातून कौतुक होतं आहे. लक्ष्मण, सचिन,कैफ आणि विराट कोहली यांच्यासह अनेक दिग्गजांनी रहाणे आणि भारतीय संघाचं कौतुक केलं आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने मेलबर्न कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियावर ८ गडी राखून मात केली. विराट कोहली आणि मोहम्मद शमी यांच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या भारतीय संघाने पहिल्या कसोटीत झालेला दारुण पराभव विसरत ऑस्ट्रेलियाला पराभवाचं पाणी पाजलं. कर्णधार अजिंक्य रहाणेने पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात नाबाद २७ धावा झळकावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. अजिंक्यच्या या शतकी खेळीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यानिमीत्ताने त्याला मानाचं Johnny Mullagh Medal देण्यात आलं.