भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपासून एकदिवसीय मालिका रंगणार आहे. १४ ते १९ जानेवारी दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची ही मालिका खेळली जाणार आहे. भारताने नुकतेच श्रीलंकेला टी २० मालिकेत २-० असे पराभूत केले आहे, तर ऑस्ट्रेलियाच्या संघाने न्यूझीलंडला कसोटी मालिकेत ३-० अशी धूळ चारली आहे. त्यामुळे आज हे दोन संघ एकमेकांसमोर विजयी लय घेऊन उभे ठाकणार आहेत.

IND vs AUS : मुंबईच्या वानखेडेवर १३ वर्षांनी वन-डे सामना

२०१२ पासून भारताच्या पदरी निराशाच

तीन एकदिवसीय सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना आज दुपारी मुंबईच्या वानखेडे मैदानावर रंगणार आहे. विशेष म्हणजे २०१२ पासून वानखेडे मैदानावर झालेल्या एकाही सामन्यात भारताला विजय मिळवता आलेले नाही. २०११ ला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने विजय मिळवला होता. त्यानंतर २०१२ पासून झालेल्या दोन्ही एकदिवसीय सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. २०१५ मध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध एकदिवसीय सामना खेळला. त्या सामन्यात भारताला २१४ धावांनी पराभूत व्हावे लागले. त्यानंतर २०१७ साली न्यूझीलंड विरूद्ध भारतीय संघ या मैदानावर खेळला होता. त्या सामन्यात न्यूझीलंडने सहा गडी राखून भारताला धूळ चारली होती. त्यामुळे आता आजच्या सामन्यात तरी भारतीय संघ विजयी होणार का याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

विराटच्या फलंदाजीचा क्रमांक बदलणार? ‘कॅप्टन कोहली’चं सूचक वक्तव्य

याशिवाय भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वानखेडे मैदानावर या आधी १७ ऑक्टोबर २००७ मध्ये शेवटचा एकदिवसीय सामना रंगला होता. या सामन्यात भारताने २ गडी राखून ऑस्ट्रेलिया विरोधात विजय मिळवला होता.

IND vs AUS : विराट की स्मिथ… सर्वोत्तम कोण? गंभीर म्हणतो…

मालिकेचे वेळापत्रक

१४ जानेवारी : भारत वि. ऑस्ट्रेलिया, पहिला एकदिवसीय सामना (मुंबई)
१७ जानेवारी : भारत वि. ऑस्ट्रेलिया, दुसरा एकदिवसीय सामना (राजकोट)
१९ जानेवारी : भारत वि. ऑस्ट्रेलिया, तिसरा एकदिवसीय सामना (बंगळुरू)

भारत दौऱ्यावर येण्याआधी वॉर्नरचा ‘टीम इंडिया’ला खास संदेश

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडिया

विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, रिषभ पंत. केदार जाधव, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह.